---Advertisement---

धोनीभाई असं करत नाही, सुरेश रैनाने कॅप्टन कूलचं केलं समर्थन!

On: शनिवार, एप्रिल 26, 2025 5:40 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी खेळाडू आणि भारताचा दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने संघाच्या 2025 मधल्या खराब प्रदर्शनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सुरेश रैनाने स्पष्टपणे म्हटले आहे की, चेन्नई संघाचा प्रत्येक निर्णय महेंद्रसिंग धोनी घेत नाही. जसे सर्वांना वाटते. सुरेश रैनाच्या म्हणण्यानुसार, महेंद्रसिंग धोनी संघासोबत आहे आणि मैदानावर चांगले कर्णधारपद भूषवत आहे. पण नीलामी सारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तो निर्णय घेत नाही.

धोनीला पाठिंबा देत सुरेश रैना म्हणाला, सर्वजण विचार करतात की धोनी सर्व निर्णय घेतो पण असं नसतं. नीलामी आणि संघ निवडण्याची जबाबदारी त्याच्यावर नसते. चेन्नई संघाचं या हंगामात प्रदर्शन अत्यंत खराब राहिलेल आहे. संघाने आतापर्यंत 9 मधील 7 सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच काल झालेल्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पराभवानंतर चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.

सुरेश रैनाने सांगितले की, संघाची निवड संघाचे संयोजन काशी विश्वनाथन आणि रूपा गुरुनाथ करत आहेत. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, काशी सरांकडे 30-40 वर्षाचं प्रशासन संभाळण्याचा अनुभव आहे आणि रूपा मॅडम खेळाडूंना निवडण्यासाठी आणि ग्रुप बनवण्यासाठी मदत करतात. या हंगामाच्या नीलामीमध्ये काही चुकीचे निर्णय घेतले गेले आहेत.

तो पुढे म्हणाला, महेंद्रसिंग धोनीचा सल्ला घेतला जातो, पण तो नीलामी मध्ये सामील होत नाही. मी स्वतः कधी नीलामीमध्ये हिस्सा घेतला नाही. धोनी खेळाडूंना रिटेन करण्यासाठी सल्ला देतो, पण नवीन खेळाडू निवडण्यासाठी कोणतेही निर्णय तो घेत नाही.

सुरेश रैनाने संघाच्या काही खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले. ज्यांनी जास्त पैसे घेतले आहेत आणि चांगले प्रदर्शन केलं नाही. तसेच तो म्हणाला की, धोनी 43 वयामध्ये विकेटकीपिंग आणि कर्णधार पदभूषवत आहे. पूर्ण संघ सांभाळत आहे, मग बाकी खेळाडू काय करत आहेत?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---