---Advertisement---

‘अंपायरचा निर्णय चुकला,’ SRH Vs RCB सामन्यानंतर सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा काय आहे प्रकरण

On: रविवार, नोव्हेंबर 1, 2020 12:04 AM
---Advertisement---

अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर शनिवारी (३१ ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा ५२वा सामना झाला. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ५ विकेट्सने नमवले. मात्र सामन्यादरम्यान पंचांनी एक चुकीचा निर्णय घेतला. त्यामुळे सोशल मिडियावर या निर्णयाची चर्चा रंगू लागली आहे.

झाले असे की, बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादपुढे १२१ धावांचे आव्हान ठेवले. त्यांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना ९व्या षटकापर्यंत हैदराबाद संघाची धावसंख्या २ बाद ६७ धावा इतकी झाली होती. त्यानंतर बेंगलोरचा गोलंदाज इसरू उदाना डावातील १० वे षटक टाकण्यासाठी आला होता.

उदानाने त्या षटकातील तिसरा चेंडू खूप वेगाने टाकला. तो चेंडू फलंदाजी करत असलेल्या केन विलियम्सनच्या अगदी डोक्याच्या वरुन गेला. मात्र विलियम्सनने कसाबसा तो चेंडू फाइन लेग बाजूला मारला. त्यानंतर तो नॉ बॉल असल्याची पंचांकडे विचारपूस करण्यात आली. मात्र पंचाने तो निर्णय फेटाळला आणि नो बॉल नसल्याचे घोषित केले.

पंचांच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधान

त्यानंतर सोशल मीडियावर पंचांचा तो निर्णय चुकीचा असल्याची चर्चा रंगली आहे. चाहत्यांसह कित्येक क्रिकटपटूंनीही यात उडी घेतली आहे. माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सामन्यादरम्यानचा तो व्हिडिओ शेअर केला आहे. आणि त्याला ‘नाही हा नो बॉल असूच शकत नाही,’ असे मजेशीर कॅप्शन त्याने दिले आहे.

जोफ्रा आर्चर आणि जिम्मी निशम यांनीही पंचांचा तो निर्णय चुकीचा वाटत नाही का?, असे ट्विट केले आहे.

हैदराबादची गुणतालिकेत भरारी

बेंगलोरला पराभूत करत हैदराबादने हंगामातील ६वा विजय नोंदवला आहे. यामुळे त्यांच्या खात्यात १२ गुणांची नोंद झाली. तसेच त्यांचा नेट रन रट +०.५५५ असल्यामुळे त्यांनी गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर बेंगलोर संघ त्यांचा हंगामातील ६वा सामना गमावूनही दूसऱ्या स्थानावर कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

खुशखबर! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितला मिळणार संधी? ‘या’ दिवशी बीसीसीआय करणार फिटनेस टेस्ट

DC प्ले ऑफमध्ये जाणार? श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गजाला वाटतेय काळजी; व्यक्त केली शंका

ज्या गोष्टीसाठी कॅप्टन्सी सोडली त्यातच फ्लॉप, माजी खेळाडूची दिनेश कार्तिकवर खोचक टीका

ट्रेंडिंग लेख-

राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट

IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश

सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---