शुक्रवारी(30 ऑक्टोबर) आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात झालेल्या लढतीत राजस्थानने पंजाबला 7 गडी राखून पराजित केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेलच्या झुंजार 99 धावा आणि कर्णधार केएल राहुलच्या 46 धावांच्या मदतीने पंजाबने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 185 धावा बनवल्या.
त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 186 धावांचा पाठलाग करताना उत्तम खेळ केला. राजस्थानने मात्र 17.3 षटकांत 7 गडी राखून पंजाबवर दणदणीत विजय मिळवला आणि दोन गुण मिळवून ‘प्ले ऑफ’ च्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले.
मोठे लक्ष्य आणि प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा दबाव असतानाही आयपीएल 2020 च्या 50 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने किंग्स इलेव्हन पंजाब संघाला पराभूत केले. या लेखात आपण राजस्थानच्या विजयाची 5 कारणे जाणून घेऊ.
1. जोफ्रा आर्चरची शानदार गोलंदाजी
खेळाच्या सुरुवातीलाच जोफ्रा आर्चरने मनदीप सिंगला खाते न उघडताच परत पाठविले. तसेच खेळपट्टीवर स्थिरवलेल्या आणि 99 वर खेळत असलेल्या ख्रिस गेलला देखील आर्चरनेच त्रिफळाचीत केले. आर्चरने 4 षटकांत 2 गडी घेत मात्र 26 धावा पंजाबच्या फलंदाजांना दिल्या.
2. रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्सची यशस्वी सलामी
पंजाबने दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली. पॉवरप्लेमध्ये 5.1 षटकांत 60 धावा रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्सने पहिल्या विकेटसाठी जोडल्या आणि संघाचे निम्मे काम सोपे केले. उथप्पाने 23 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारा सह 30 धावांची खेळी केली. तर स्टोक्सने अर्धशतक केले.
3. बेन स्टोक्सची अष्टपैलू कामगिरी
बेन स्टोक्सने या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशी तिनही विभागात आपले योगदान दिले. त्याने गोलंदाजी करताना त्याने 4 षटकांत 32 धावा देऊन 2 बळी टिपले. यानंतर सलामीला फलंदाजीस उतरून त्याने 26 चेंडूंचा सामना करीत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. यात त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. तसेच क्षेत्ररक्षणावेळी त्याने मनदीपचा झेल घेतला होता.
4. संजू सेमसनने केल्या ताबडतोब धावा
बेन स्टोक्स बाद झाल्या नंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या राजस्थानच्या युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने उथप्पा सोबत 51 धावांची भागेदारी केली. सेमसनने 25 चेंडूंचा सामना केला ज्यात चार चौकार आणि तीन षटकार ठोकून 48 धावा केल्या.
5. जॉस बटलर आणि स्टीव्ह स्मिथच्या महत्त्वपूर्ण 41 धावा
वरच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीत चौथ्या विकेटसाठी फलंदाजीस उतरलेल्या जॉस बटलरने 11 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या. त्याचबरोबर मागील काही सामन्यांत काहीसा थंड खेळ करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने देखील 20 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. या दोघांनीही विकेट न जाऊ देता 41 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
महत्त्वाच्या बातम्या –
दुष्काळात तेरावा महिना ! हैदराबादचा ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
‘हा’ खेळाडू बनू शकतो तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू, गंभीरची भविष्यवाणी
कमाल लाजवाब राहूल! आयपीएलमध्ये अनोखी कामगिरी करत विराट कोहलीच्या विक्रमाची केली बरोबरी
ट्रेंडिंग लेख –
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला






