भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथील कसोटी सामन्यात वर्णभेद संदर्भात मोठा वाद निर्माण झाला होता. सामन्यादरम्यान काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षक मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह वर वर्णभेदात्मक अपशब्द वापरत होते. या संदर्भात मोहम्मद सिराज व कर्णधार अजिंक्य रहाणेने अंपायरशी चर्चा केल्यानंतर काही प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलून दिले गेले. या संतापजनक प्रकरणाबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वातून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच बातमी समोर येत काही की इंग्लंडमध्ये वर्णभेद कमी करण्यासंदर्भात खेळाडूंना योग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वर्णभेद संदर्भात इंग्लंडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बातम्या समोर येत असतात. त्यामुळे वर्णभेद कमी करण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका सर्वेनुसार निदर्शनास आले की इंग्लंडमध्ये कृष्वर्णीय व आशियाई खेळाडूंसंदर्भात दूषित पूर्वग्रह बाळगला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणामध्ये ड्रेसिंग रूममध्ये वागण्याची पद्धत तसेच विविध संस्कृतींच्या व्यक्तींबद्दलचा सादर शिकवला जाईल. त्याचसोबत एखादी चुकीची घटना घडत असेल तर त्याला विरोध करणे देखील गरजेचे असेल. मागील काही दिवसांत 600 खेळाडूंचा सर्वे करण्यात आला होता व त्यातील तब्बल 45 टक्के खेळाडूंनी सांगितले की त्यांच्यावर वर्णभेद केला गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आजच्या दिवशी तब्बल २७ वर्षांपुर्वी भारताने केली होती इंग्लंडवर मात, अझरुद्दीन ठरले होते विजयाचे नायक
सौरव गांगुली हेल्थ अपडेट; दुसरी अँजिओप्लास्टी केल्यानंतर प्रकृती स्थिर, अजून होणार चाचण्या
जसप्रीत बुमराह विरुद्ध रणनीती आखणे महाकठीण; इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सची प्रतिक्रिया






