सूर्यकुमार यादव याला वनडे विश्वचषक 2023 साठी भारतीय संघात निवडले गेले आहे. असे असले तरी, सूर्यकुमारचे वनडे क्रिकेटमधील आकडे पाहता हा निर्णय धाडसी म्हणता येईल. कारण या प्रकारात सूर्यकुमार अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (22 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्याआधी राहुल द्रविड यांची खास प्रतिक्रिया समोर येत आहे.
राहुल द्रविड (Rahul Dravid) मागच्या मोठ्या काळापासून भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. प्रशिक्षक म्हणून त्यांच्या कार्यकाळात भारताने नुकताच आशिया चषक जिंकला असून वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी यजमान संघ प्रबळ दावेदार आहे. वनडे विश्वचषकानंतर द्राविडचा संघासोबतचा कार्यकाळ देखील संपणार आहे. याच कारणास्त मुख्य प्रशिक्षक देखील भारताला विजेतेपद मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील. वनडे क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करू न शकलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) वनडे विश्वचषकात भारतासाठी खेळताना दिसू शकतो. पण त्याआधी सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करणे महत्वाचे आहे.
सूर्यकुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी संघात घेतले गेले आहे. राहुल द्रविड यांच्या मते सूर्यकुमार मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगला खेळला पाहिजे. या सामन्यांममधील प्रदर्शनावर फलंदाजाचा पुढचा प्रवास ठरू शकतो, असे द्रविडच्या विधानातून जाणवते. शुक्रवारी पहिल्या वनडे सामन्यापूर्वी द्रविड माध्यमांसमोर म्हणाले, “आम्ही सूर्यकुमारला पूर्ण समर्थन देत आहोत. तो वनडे क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करेल, असे आम्हाला वाटते. तसेच वनडे प्रकारातील आपली स्थिती बदलू शकले. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये संधी मिळेल.”
सूर्यकुमारचे वनडे क्रिकेटमधील आकडे पाहिले, तर त्याने 24.40च्या सरासरीने 357 धावा केल्या आहेत. जुलै 2021 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने पहिला सामना खेळला आणि त्यानंतर आतापर्यंत 27 सामन्यात त्याला संघ व्यवस्थापनाने त्याला संधी दिली आहे. (Suryakumar got an ultimatum? A big statement from the coach before the start of the ODI series against Australia)
महत्वाच्या बातम्या –
सुनील छेत्रीने जिंकलं 140 कोटी भारतीयांचं मन, Asian Games 2023मध्ये संघाला मिळवून दिला पहिला विजय
रोहित जसा 2019 World Cupमध्ये खेळला, तसा आता ‘हा’ फलंदाज खेळणार; रैनाने 14 दिवसांआधीच केली भविष्यवाणी