भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (INDvWI) यांच्यात रविवारी (२० फेब्रुवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर तिसरा टी२० सामना पार पडला. भारतीय संघाने १७ धावांनी हा सामना जिंकला. यासह यजमानांनी ३-० अशा फरकाने ३ सामन्यांची टी२० मालिका खिशात घातली आहे. यापूर्वी वनडे मालिकेतही भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ३-० ने व्हाईट वॉश दिला होता. या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणारा भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सामनावीर ठरला. आपल्या आक्रमक खेळी दरम्यान सूर्यकुमारने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली.
सूर्यकुमारची वादळी खेळी
आघाडीचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. संघ अडचणीत असताना त्याने जबाबदारीने खेळ केला. संथ सुरुवात केल्यानंतर त्याने वेस्ट इंडिजच्या सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने भारतीय डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी ३१ चेंडूवर एक चौकार व तब्बल सात षटकारांची आतिषबाजी करत ६५ धावा चोपल्या. हे त्याच्या टी२० कारकिर्दीतील चौथे अर्धशतक ठरले.
छोट्याशा कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी
सूर्यकुमार यादव याने आपल्या या खेळीत दरम्यान आपल्या टी२० कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध केलेली ६२ धावांची खेळी त्याची सर्वोत्कृष्ट होती. तसेच त्याने इंग्लंड व श्रीलंकेविरुद्ध देखील अर्धशतके नोंदवली होती. इंग्लंडविरुद्ध त्याने ५७ तर श्रीलंकेविरुद्ध ५० धावा केला होत्या. या खेळीसह त्याने संघातील आपली जागा जवळपास नक्की केली. सूर्यकुमार याच्या कारकिर्दीचा विचार केला तर, त्याने आत्तापर्यंत भारतीय संघासाठी १४ टी२० सामने खेळताना ३९ च्या सरासरीने ३५१ धावा केल्या आहेत. तर, ७ वनडे सामन्यात ५३.४० च्या सरासरीने २६७ धावा जमविलेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ चे वेळापत्रक जाहीर होण्यास का होतोय विलंब? कारण आले पुढे (mahasports.in)