---Advertisement---

सूर्यकुमार भारताच्या कसोटी ताफ्यात सामील, ‘अशी’ आहे पहिल्या कसोटीसाठीची प्लेइंग इलेव्हन

On: गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023 9:34 AM
BGT 1st Test toss
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी (9 फेब्रुवारी) सुरू झाला. नागपूरमच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला असून पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी टी-20 फॉरमॅट गाजवणारा फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्यातून कसोटी कारकिर्दीची सुरुवात करत आहे. भारतीय दिग्गज आणि संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून सूर्यकुमार यादवला संघाची ‘टेस्ट डेब्यू कॅफ’ मिळाली.

पहिल्या कसोटीसाठी निवडलेल्या भारतीय संघा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) कसोटी पदार्पण करत आहेच. पण त्याच्या साधीने यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत (KS Bharat) यालाही कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. भरत मागच्या काही मोठ्या काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आला आहे. अशात गुरुवारी अखेर कसोटी पदार्पणासाठी त्याची प्रतिक्षा संपली. भारताचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील मोठ्या काळानंतर भारतासाठी खेळताना दिसेल. दुकापतीनंतर मागचे काही महिने जडेजा क्रिकेटपासून दूर होता. मागच्या महिन्यात त्याने देशांतर्गत सामन्यातून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले आणि बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy 2023) पहिल्या कसोटी सामन्यातही जागा पक्की केली.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडेलली भारत आणि ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल,  चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा,  आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब,  ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लिऑन, टॉड मर्फी, स्कॉट बोलंड.

ऑस्ट्रेलियन संघाने देखील भारतीय खेळपट्टीचा विचार करून संघ निवडला. भारतीय खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असल्यामुळे ऑस्ट्रेलायने संघात दोन फिरकी गोलंदाज सामील केले. नाथन लिऑन आणि टॉड मर्फी या फिरकी गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची जबाबदारी असेल. टॉड मर्फी (Todd Murphy) याचा हा ऑस्ट्रेलियन संघासाठी पहिलाच कसोटी सामना आहे. अशात कसोटी पदार्पणाच्या सामन्यात त्याच्याकडून संघाला चांगल्या प्रदर्शनाच्या अपेक्षा असतील.


(Suryakumar joins India’s Test squad, this is the playing eleven for the first Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

ब्बल 75 वर्षांपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता पहिला कसोटी सामना
आयसीसी रेटिंगमध्ये शुबमन गिलची मोठी झेप, हार्दिक लवकरच बनणार सर्वोत्तम अष्टपैलू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---