---Advertisement---

सेहवाग-सचिनने जी कामगिरी कसोटी-वनडेत केली, तसाच कारनामा सूर्यकुमारने टी२०त केलाय

Suryakumar-Yadav
---Advertisement---

नॉटिंगघम येथे झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने १७ धावांनी विजय मिळवला. असे असले तरी भारताकडून ५५ चेंडूत ११७ धावांची शतकी खेळी करणारा सूर्यकुमार यादव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.  या खेळीदरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पराभूत झालेल्या सामन्यात भारताकडून सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रमही केला.

भारताकडून कसोटीत पराभूत सामन्यात सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध पराभूत झालेल्या बंगळुरू कसोटीत २०१ धावांची खेळी केली होती. तसेच वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने पराभूत सामन्यात भारताकडून सर्वोच्च धावांची खेळी केली आहे. सचिनने हैदराबाद येथे झालेल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७५ धावांची खेळी केली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

(ही बातमी ९० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---