---Advertisement---

सर्वत्र सूर्या! एका दमदार खेळीने केले अनेक ‘रेकॉर्ड ब्रेक’

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 7:41 AM
Suryakumar Yadav
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सेंट किट्स येथे नुकताच पार पडला.‌ पाहुण्या भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत हा सामना ७ गड्यांनी आपल्या नावे केला. यासह भारतीय संघ मालिकेत २-१ अशा फरकाने आघाडीवर पोहोचला आहे. नव्याने सलामीवीर झालेला फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्याचा मानकरी ठरला. त्याने आपल्या अर्धशतकी खेळी दरम्यान काही विक्रमांना गवसणी घातली.

सूर्यकुमारची आणखी एक अफलातून खेळी

सलग तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमारला अपयश आले होते.‌ रोहित शर्माने दुसऱ्या षटकात रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. सूर्याने वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना हैराण करत ४४ चेंडूवर ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी साकारली.

विक्रमातही सूर्याच सरस

नुकतीच इंग्लंडमध्ये टी२० सामन्यात शतकी खेळी करून आलेल्या सूर्य कुमारने आपल्या या खेळी दरम्यान काही विक्रम नोंदवले. सूर्यकुमार भारतीय संघासाठी टी२० पदार्पण केल्यानंतर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ३८.१ च्या सरासरीने तसेच १७५. ६ च्या स्ट्राईक रेटने ६४८ धावा बनविल्या आहेत. या यादीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा ६८१ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

याचप्रमाणे भारतासाठी खेळलेल्या पहिल्या २० टी२० मध्ये धावा करण्याच्या बाबतीतही तो दुसऱ्या क्रमांकावर आला. या यादीमध्ये पहिल्या स्थानी केएल राहुल विराजमान आहे. राहुलने आपल्या पहिल्या २० टी२० मध्ये ७५५ धावा कुटल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक

तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल

भारीच! तीन महिन्यात दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी पर्वणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---