दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर गुरुवारी (२९ एप्रिल) पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात मुंबई संघाने जोरदार विजय मिळवला होता. या सामन्यात क्विंटन डी कॉकच्या नाबाद ७० धावांच्या खेळीमुळे मुंबई संघाने विजय मिळवला होता. तसेच हा सामना झाल्यानंतर मुंबई संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आपल्या पत्नीवर प्रेम करताना दिसून आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात फलंदाजी करताना सूर्यकुमारला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. तो १० चेंडूत अवघ्या १६ धावा करत माघारी परतला होता. परंतु हा सामना झाल्यानंतर त्याने असे काही कृत्य केले ज्याने सर्वांचेच मन जिंकून घेतले आहे.
तर झाले असे की, जहीर खानची पत्नी सागरिका घाटगे हीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी आजूबाजूच्यांची कसलीही काळजी न करता एकमेकांना कीस करताना दिसून येत आहेत. परंतु ही कीस जरा वेगळ्या प्रकारची होती. कीस करताना त्यांच्यामध्ये मोठी काच होती. या दोघांचे प्रेम पाहून क्रिकेट चाहते ही भावुक झाले आहेत.
These two! 🥰💙🥰#OneFamily #MumbaiIndians #MI @surya_14kumar pic.twitter.com/Xgb2SEJXat
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2021
या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान संघाने २० षटक अखेर १७१ धावा केल्या होत्या. यामध्ये संजू सॅमसनने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली होती. तसेच जोस बटलरने ताबडतोड ४१ धावा केल्या होत्या.
त्यांनतर दुसऱ्या डावात १७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाकडून क्विंटन डीकॉक ने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली होती. तर कृणाल पंड्याने ३९ धावांचे योगदान दिले होते. हा सामना मुंबई संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
छोटा पॅकेट बडा धमाका! मावीच्या एकाच षटकात सलग ६ चौकार कसे मारले? पृथ्वीने सांगितली ‘राज की बात’
‘जिथेही जातो तिथे आग लावतो,’ मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहितला वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा
त्यांचा स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही परंतु रोहितला मात्र त्यांनी घडवले