---Advertisement---

‘त्यांचा’ स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही, मात्र रोहित शर्माला त्यांनी मुलासारखे घडवले । HBD Rohit Sharma

---Advertisement---

२००७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला रोहित शर्माने १७ वर्षांच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेक मोठे पराक्रम केले आहेत. पण रोहितला घडवण्याचे काम सुरुवातीला दिनेश लाड यांनी केले.

रोहित ११ वर्षांचा असल्यापासून दिनेश लाड यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. रोहितने त्याच्या क्रिकेटची सुरुवात एक ऑफ-स्पिनर गोलंदाज म्हणून केली होती. पण लाड यांनी त्याच्यातील फलंदाजीचे कौशल्य ओळखल्याने त्यांनी त्याला फलंदाजीवर लक्ष देण्यास सांगितले. त्यामुळे रोहित पुढे जाऊन फलंदाज बनला.

एवढेच नाही तर ज्यावेळी रोहितला शाळेची फी भरणे शक्य नव्हते तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी शिष्यवृत्तीची सोय केली होती.

लाड यांनी रोहित बरोबरच हरमीत सिंग, शार्दुल ठाकूर आणि त्याचा स्वत:चा मुलगा सिद्धेश लाड यांनाही प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले रोहित आणि शार्दुल यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र त्यांचा स्वत:चा मुलगा सिद्धेशला अजून तरी भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.

सिद्धेश देशांतर्गत क्रिकेट मुंबईकडून खेळतो. तसेच त्याची भारतीय अ संघातही निवड झाली होती. तो भारतीय अ संघातील नियमित सदस्य आहे. मात्र त्याच्यासाठी अजून तरी वरिष्ठ भारतीय संघाचे दार उघडे  झालेले नाही.

२७ वर्षीय सिद्धेशने आत्तापर्यंत ६१ प्रथम श्रेणी सामन्यात ४०.५८ च्या सरासरीने ४०५८ धावा केल्या आहेेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ३९ सामन्यात ११४० धावा केल्या आहेत.

संबंधित लेख –
– रोहित शर्माचा 37वा वाढदिवस, जाणून घ्या टीम इंडियाच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती? वर्षाला किती रुपये कमावतो ‘हिटमॅन’?
– खेळाडू म्हणून 6 पैकी 6 आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू । HBD Rohit Sharma
– रोहित होता मधल्या फळीतील फलंदाज, ‘या’ सामन्यात मिळाली सलामीला संधी आणि पुढे घडला तो इतिहास… । HDB Rohit

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---