इंडियन प्रीमीयर लीगमध्ये(आयपीएल) आत्तापर्यंत अनेक खेळाडूंनी मोठे पराक्रम केले आहेत. पण आयपीएलमध्ये असा एक विक्रम आहे जो केवळ रोहित शर्माच्या नावावर आहे. तो विक्रम म्हणजे खेळाडू म्हणून ६ पैकी ६ आयपीएलचे अंतिम सामने जिंकणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.
रोहितने २००९ ला डेक्कन चार्जर्सकडून खेळताना पहिल्यांदा आयपीएलच्या विजेतेपदाची चव चाखली होती. त्यावेळी त्याने अंतिम सामन्यात २३ चेंडूत २४ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे २००९ च्या आयपीएल मोसमात रोहितने मुंबई इंडियन्स विरुद्ध गोलंदाजी करताना हॅट्रिकही घेतली होती.
नंतर रोहित २०११ पासून मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० ला आयपीएलचे विजेतेपदे जिंकली आहेत. खास गोष्ट म्हणजे या पाचही मोसमात रोहितने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे तो कर्णधार म्हणूनही आयपीएलची ५ विजेतेपदे मिळवणारा पहिला कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
– रिषभ पंतचा भीषण अपघात आठवून भावूक झाला शाहरुख खान; म्हणाला, “तो मला मुलासारखा…”
– हार्दिक पांड्याला बसू शकतो धक्का, टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा उपकर्णधार
– लखनऊच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘राजधानी एक्स्प्रेस’ फिट