---Advertisement---

रिषभ पंतचा भीषण अपघात आठवून भावूक झाला शाहरुख खान; म्हणाला, “तो मला मुलासारखा…”

---Advertisement---

देशात सध्या आयपीएल 2024 ची धूम आहे. या हंगामात शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

नुकताच शाहरुख खानचा एक खास व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतच्या अपघाताविषयी बोलताना दिसत आहे. ‘स्टार स्पोर्ट्स इंडिया’नं आपल्या अधिकृत ‘X’ खात्यावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. शाहरुख खान म्हणतो की, “अपघातानंतर रिषभ पंतची कार पाहून मी खूप घाबरलो होतो. मी तो व्हिडीओ पाहिला होता. त्या अपघाताचा परिणाम काय झाला हे आम्हाला माहीत नव्हतं. हीच सर्वात वाईट भावना होती. रिषभच्या वयाची मुलं माझ्यासाठी माझ्या मुलांसारखी आहेत. विशेषत: एका खेळाडूला दुखापत होणं फार गंभीर असतं”.

शाहरुख पुढे म्हणाला, “आमच्यासाठी किंवा तुमच्यासाठी किंचित दुखापत होणं हे सामान्य आहे. रिषभ पंत हा खूप धीराचा खेळाडू आहे. मला आशा आहे की त्याचा गुडघा ठीक असेल. त्यामुळेच मी त्याला उठू नकोस, तुला वेदना होत असतील असं सांगत होतो. अपघातानंतर मी त्याला पाहिलं नाही. त्यामुळे तो चांगला खेळत आहे याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की तो चांगला खेळत राहील.”

 

भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात त्याची मर्सिडीज कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. स्थानिक लोकांच्या मदतीनं पंतचं प्राण वाचलं. अपघातानंतर पंतला बरे होण्यासाठी बराच वेळ लागला आणि अनेक शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या. मात्र, तंदुरुस्तीच्या खडतर प्रवासात डावखुऱ्या खेळाडूनं पुनरागमनाची आशा सोडली नाही आणि मेहनत सुरूच ठेवली. आयपीएल 2024 मधून पंत क्रिकेटच्या मैदानात परतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हार्दिक पांड्याला बसू शकतो धक्का, टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा उपकर्णधार

लखनऊच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘राजधानी एक्स्प्रेस’ फिट

ईडन गार्डन्सवर कोलकाता विरुद्ध दिल्ली महत्त्वाचा सामना, रिषभ पंतनं जिंकला टॉस; जाणून घ्या प्लेइंग 11

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---