Suryakumar Yadav Wife Reaction : श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून टी20 मालिकेसाठी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्त्वाखाली 27 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळेल. 30 जुलैला शेवटचा सामना होईल. हे सर्व सामने पल्लेकल्ले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहेत. सूर्यकुमारकडे भारतीय टी20 संघाच्या नेतृत्त्वाची कमान आल्यानंतर पत्नी देविशा शेट्टी (Suryakumar Yadav Wife Devisha Shetty) हिने भावूक पोस्ट केली आहे.
सूर्यकुमारच्या पत्नीची भावूक पोस्ट
सूर्यकुमार कर्णधार झाल्यानंतर त्याची पत्नी देविशा शेट्टीने खास स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. देविशाने लिहिले की, ‘जेव्हा तू भारतासाठी खेळायला सुरुवात केलीस तेव्हा हा दिवस येईल असे आम्हाला वाटले नव्हते! पण देव महान आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ वेळेवर मिळते. मला तुझा खूप अभिमान आहे. तू आयुष्यात किती पुढे आला आहेस, पण ही फक्त तुझ्या स्वतःच्या वारशाची सुरुवात आहे. अजून तुला बराच पल्ला गाठायचा आहे.’
श्रीलंकेविरुद्ध कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची परीक्षा!
दरम्यान भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार हा एक स्फोटक फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 167 च्या स्ट्राइक रेटने एकूण चार शतके आणि 19 अर्धशतकेही केली आहेत. त्याची आक्रमक फलंदाजी दबावाच्या परिस्थितीत खूप उपयुक्त ठरते. त्याच वेळी, भारताचा कर्णधार असताना सूर्यकुमारने 7 टी20 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत. आता श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल. सूर्यकुमार नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या विश्वासावर खरा उतरत श्रीलंकेविरुद्ध उत्तम कर्णधार म्हणून समोर आल्यास आगामी 2026 टी20 विश्वचषकातही तो कर्णधारपदी कायम राहू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी यापेक्षा अधिक काय करू”, मोहम्मद शमीचा टीम मॅनेजमेंटला सवाल; विश्वचषकात मिळाली नव्हती संधी
क्रिकेटच्या मैदानात चक्क कोल्होबाची एंट्री! सैरभैर धावून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, एकदा VIDEO पाहाच
गौतम गंभीरची इच्छा पूर्ण! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार केकेआरमधील साथीदार