आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ पहिले तिन्ही सामने हरल्यानंतर गुणतालिकेत तळाशी आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 7 एप्रिल रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. या सामन्यापूर्वी मुंबईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
टीमचा स्टार फलंदाज आणि फॅन्सचा आवडता खेळाडू सूर्यकुमार यादव संघामध्ये परतला आहे. सूर्यकुमार दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. त्याचं बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन सुरू होतं. अखेर मुंबईच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. बीसीसीआयनं सूर्यकुमार यादवला फिटनेस प्रमाणपत्र दिलं, ज्यानंतर आता त्याचं मुंबईच्या टीममध्ये आगमन झालं आहे.
मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमार यादवचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं. सूर्याच्या आगमनाचा व्हिडिओ शेअर करताना टीमनं लिहिलं, “ज्याची आम्ही वाट पाहत होतो, तो सूर्या दादा आला!” या व्हिडिओवर चाहते कमेंट करून आनंद व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2024 मध्ये पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. हा या हंगामातील एकमेव संघ आहे ज्यानं अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. मुंबईला गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलाय. आता आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनानं मुंबई इंडियन्स विजयी मार्गावर परतणार का? याचे उत्तर येत्या सामन्यांमध्येच मिळेल.
मुंबईला पुढील तीन सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. त्यांचा पुढचा सामना 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मुंबईनं शेवटचा सामना 1 एप्रिल रोजी खेळला होता. त्यानंतर संघाला सहा दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. या ब्रेक दरम्यान, मुंबई इंडियन्सनं विविध खेळ घेत ड्रेसिंग रूममधील वातावरण सुधारण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यापासून मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे आशुतोष शर्मा? पठ्ठ्यानं केवळ 11 चेंडूत ठोकलंय अर्धशतक! जाणून घ्या
हैदराबादविरुद्ध ‘थाला’ धारण करतो रौद्र रूप! आकडेवारी भयंकर….पॅट कमिन्सच्या संघाला घ्यावी लागेल काळजी