अहमदाबाद। बुधवारी (९ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (2nd ODI) भारताची फलंदाजी फारशी चांगली झाली नव्हती. पण, या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने आपल्या फलंदाजीने भारताचा डाव सावरला होता. त्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली, याबरोबक एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.
सूर्यकुमारचे विक्रमी अर्धशतक
बुधवारी झालेला सामना सूर्यकुमारचा वनडे कारकिर्दीतील ६ वा सामना होता. त्याने गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने खेळलेल्या पहिल्या सहाही सामन्यात ३० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे तो असा कारनामा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे (30+ runs in first 6 ODI).
त्याने बुधवारी ८३ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार मारले. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या तीन वनडे सामन्यात नाबाद ३१, ५३ आणि ४० अशा धावांच्या खेळी केल्या होत्या. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा सामना खेळला. या सामन्यात त्याने ३९ धावांची खेळी केली, तर सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने नाबाद ३४ धावांची खेळी केली होती. हा त्याचा कारकिर्दीतील पाचवा वनडे सामना होता.
FIFTY for @surya_14kumar! 👏 👏
A solid effort from the #TeamIndia right-hander as he brings up his 2nd ODI half-century. 👍 👍 #INDvWI @Paytm
Follow the match ▶️ https://t.co/yqSjTw302p pic.twitter.com/Y8cDASoVAX
— BCCI (@BCCI) February 9, 2022
भारताचा डाव सूर्यकुमार केएल राहुलने सावरला
बुधवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण, भारताची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्या तीन विकेट्स ४३ धावांवर गमावल्या. पण, त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केएल राहुल आणि सूर्यकुमारने भारताचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.
राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने वॉशिंग्टन सुंदरसह ४३ धावांची भागीदारी करत भारताला १७० धावांचा टप्पा पार करून दिला. हे दोघे बाद झाल्यानंतर भारताची तळातल्या फलंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण, तेही फार काळ तग धरू शकले नाहीत. त्यामुळे भारताला ५० षटकात ९ बाद २३७ धावांवर समाधान मानावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या वनडेला स्पेशल पाहुण्यांची उपस्थिती, पण रोहित- विराटशी नाही होऊ शकली ‘युवा ब्रिगेड’ची भेट
कर्णधार रोहितचा ‘मास्टरस्ट्रोक’ निघाला निकामी, तब्बल ११ वर्षांनंतरचा ‘तो’ प्रयत्न सपशेल फेल
फलंदाजीत फेल, तरीही कोहलीच्या नावावर ‘विराट’ विक्रमाची नोंद; गांगुलीला टाकलंय मागे