---Advertisement---

आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान

On: शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022 3:28 PM
---Advertisement---

टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांची मने जिंकणाऱ्या सूर्यकुमार यादवने एक नवीन कार खरेदी केली आहे. त्याच्या कारची किंमत तब्बल २.१५ कोटी आहे. त्याने घेतलेली गाडी मर्सिडीज-बेंझची एक लक्झरी कार आहे. सूर्यकुमार यादवकडे अनेक महागड्या गाड्यांचा संग्रह आहे. यामध्ये आता आणखी एका महागड्या कारचा समावेश झाल्याने चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

Suryakumar-yadav-new-car
Photo Courtesy : Twitter

सूर्यकुमार यादव यांच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत, ज्यात रेंज रोव्हर वेलार, मिनी कूपर एस, ऑडी आरएस 5 आणि स्कोडा सुपरब सेडान सारख्या गाड्यांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव यांना महागड्या गाड्या चालवण्याची खूप आवड असल्याचे त्याने अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळेच तो वेळोवेळी असा महागड्या गाड्या त्याच्या गॅरेजमध्ये जमा करून ठेवत असतो. अद्याप सूर्यकुमारने अधिकृतपणे गाजी घेतली असल्याचे उघड केले नसले ती त्याचे नविन गाडीसोबतचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/CZUrRZbPCGj/?utm_source=ig_web_copy_link

सूर्यकुमार यादवने नुकत्याच खेलल्या गेलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मलिकेत पहिल्यांदा सलामीवीराची भुमिका बजावली. यावेळी त्याची कामगिरी वाखाडण्याजोगी होती. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरल्यानंतर टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. ज्याचा थेट फायदा त्याला आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत झाला आहे. सूर्यकुमार सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी पाकिस्तानच्या बाबर आझमशी झुंज देत आहे आणि आगामी आशिया चषक २०२२मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. सूर्यकुमार सध्या टी-२० मध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर त्याच्या आधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. भारताकडून सूर्यकुमारला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने संधीचं सोनं केलं आहे. त्यामुळेच त्याला सध्या टीम इंडियाच्या आशिया चषकाच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. आणि आगामी टी-२० विश्वचषकाच्या संघातही सूर्यकुमार यादवने आपले स्थान पक्के केले आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

चांगला फॉर्म, सर्वाधिक धावा; तरीही आशिया चषकासाठी दुर्लक्षित राहिले ‘हे’ दोघे भारतीय

‘भारतीय संघात पुनरागमन करणारा राहुल ठरेल कोहलीपेक्षा वरचढ!’ भारताच्या माजी दिग्गजाचा दावा

पाकिस्तानी खेळाडू यावर्षी भारतात क्रिकेट खेळणार? स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणार विशेष सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---