---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध 32 चेंडूत अर्धशतक, पुढच्या 17 चेंडूत शतक; सूर्यकुमार यादवने लावली विक्रमांची रांग

Suryakumar Yadav
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव नावाचे वादळ 2021पासून सुरू झाले ते अजूनपर्यंत थांबले नाही. आता त्याचा धक्का किवी संघाला बसला आहे. झाले असे की, न्यूझीलंड-भारत यांच्यात टी20 मालिका खेळली जात आहे. यातील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) खेळला गेला. ज्यामध्ये सूर्यकुमारने नाबाद शतकी खेळी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यातील एक महत्वाचा विक्रम असा की त्याने आपल्या पहिल्या 50 धावा 32 चेंडूत पूर्ण केल्या, तर नंतरच्या 50 धावा 17 चेंडूतच पूर्ण करत शतक केले.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने केलेले विक्रम-
1) सूर्यकुमार टी20 क्रिकेटमध्ये सलामीला न येता 1000 धावा पूर्ण करणारा क्रिकेटविश्वात पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने यावर्षी 30 सामन्यात खेळताना 47.95च्या सरासरीने 1151 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 188.37 राहिला. त्यामध्ये त्याने 9 अर्धशतके आणि 2 शतके केली.

2) सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एका वर्षात दोन शतके करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) नंतरचा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.

3) सूर्यकुमारने नाबाद 111 धावा केल्याने भारतीय फलंदाजाकडून टी20 क्रिकेटमध्ये केलेली ही चौथी सर्वोच्च खेळी ठरली. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने याचवर्षी अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावा केल्या होत्या.

4) सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शेवटच्या 5 षटकात 50 किंवा 50 पेक्षा अधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याचवर्षी वेस्ट इंडिजच्या दौऱ्याच्या आधी शेवटच्या 5 षटकात 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम युवराज सिंग याच्या नावावर होता. युवराजने 2007मध्ये इंग्लंड विरुद्ध अशी कामगिरी केली. आशिया चषक 2022पासून ते आतापर्यंत असे 6 वेळा झाले आहे. त्यामध्ये सूर्यकुमारने 3, हार्दिक पंड्या याने 2 आणि विराट कोहली याने एकदा असे केले आहे.

5) सूर्यकुमारने न्यूझीलंडच्या विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर हे शतक केले आहे. याआधी त्याने इंग्लंड विरुद्ध इंग्लंडच्या घरच्या मैदानावर शतक केले होते.

6) सूर्यकुमारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20च्या सामन्यांमध्ये 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने 100 पेक्षा अधिक धावा आतापर्यंत दोन वेळा केल्या आहेत. अशी कामगिरी केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी एकदा केली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मलिंगानंतर साऊदीच! शानदार हॅट्रिकसह नावावर केला मोठा विक्रम
भारताच्या क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ विलक्षण घटना, सलामीला पहिल्यांदाच..

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---