---Advertisement---

सूर्याचा स्पेशल सिक्स! शेवटच्या चेंडूवर साकारले पहिले आयपीएल शतक

Suryakumar Yadav
---Advertisement---

आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव नावाचे वादल नेहमीच थैमान घालत आले आहे. पण शुक्रवारी (12 मे) सूर्यकुमार यादव याने आपले पहिलेच आयपीएल शतक केले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईसाठी खेळताना सूर्यकुमारने अवग्या 49 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 103 धावा कुटल्या. डावातील शेवटचा चेंडू सूर्यकुमारसाठी खास ठरला.

मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर 20 षटकांमध्ये 5 बाद 218 धावा केल्या. सूर्यकुमारव्यतिरिक्त सलामीवीर ईशान किशन याने 31, तर विष्णू विनोद याने 30 धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा सुरुवातीला चांगल्या लयीत दिसला. पण 18 चेंडूत 29 धावा करून रोहितनेही विकेट गमावली. सूर्यकुमारने मुंबईच्या डावातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि शतक पूर्ण केले. हा षटकार सूर्यकुमारने बॅकवर्ड स्केअर लेगच्या दिशेने मारला. षटकारानंतर चाहत्यांमद्ये जोरादर उत्साह पाहायला मिळाला आणि सूर्याच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1657055884617617408?s=20

मुंबईसाठी सूर्यकुमार या सामन्यात हिरोट ठरला. तर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातसाठी अष्टपैलू राशिद खानने जबरदस्त प्रदर्शन केले. राशिदने आपल्या चार षटकांमध्ये 30 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन, नेहाल वढेला आणि टिम डेविड राशिदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. वढेरा आणि डेविडने अनुक्रमे 15 आणि 5 धावा करून विकेट्स गमावल्या. मोहीत शर्मा याने गुजरातसाठी विष्णू विनोदला बाद केले. विष्णू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आला होता. मुंबई इंडियन्स गोलंदाजीला आल्यानंतर फिरकीपटू पियुष चावला, कुमार कार्तियेक आणि आकाश मधवाल यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. 14व्या षटकात गुजरातने 103 धावा करून 8 विकेट्स गमावल्या होत्या. (Suryakumar Yadav completed his maiden IPL century with a six on last ball of the innings)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत सूर्याने झळकावले IPLचे पहिले शतक, मुंबईचा स्कोर 200च्या पार
Breaking । विंडीज संघाच्या Head Coach पदी ‘या’ 2 दिग्गजांची निवड, एक तर दोन वेळचा टी20 चॅम्पियन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---