इंडियन प्रीमियर लीग 2023 सुरू असतानाच चाहत्यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मात्र, ही बातमी बिग बॅश लीग या टी20 स्पर्धेबाबत आहे. ऑस्ट्रेलियाने बीबीएलमधील सामने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समोर येत आहे की, प्रसारकांशी झालेल्या करारानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता बीबीएलमध्ये 56 ऐवजी 40 सामने खेळवले जातील. याचा अर्थ बिग बॅश लीगमधील 16 सामने कमी खेळले जाणार आहेत.
तसेच, या नवीन हंगामापासून प्रत्येक संघ आता फक्त 10 सामने खेळू शकणार आहे. या उन्हाळ्यापासून बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत ही नवीन तरतूद जोडली जाईल. साखळी फेरी सामन्यांव्यतिरिक्त अंतिम मालिकेचे वेळापत्रकही छोटे करण्यात आले आहे. आता 5 ऐवजी फक्त 4 संघ अंतिम फेरीत जातील. मात्र, त्याचे स्वरूप अद्याप ठरलेले नाही.
डिसेंबरमध्ये होणार सामने
अद्याप या स्पर्धेचे वेळापत्रक समोर आलेले नाही. मात्र, वेळापत्रक जुलैमध्ये जाहीर केले जाण्याची अपेक्षा वर्तवली जात असून, सामने डिसेंबरमध्ये सुरू होतील. दरम्यान, सामने कमी केल्यामुळे, लीग 6 ते 7 वर्षे मागे पोहोचली आहे. याचा अर्थ असा की, (2017-18) जेव्हा आठ संघांची बिग बॅश लीग सर्वत्र लोकप्रिय होती. वेळेच्या कमतरतेमुळे ख्रिसमसमुळे शाळेच्या सुट्ट्यांमध्ये हंगाम पूर्ण करावा लागू शकतो. तसेच, परदेशातील खेळाडू अधिक सामन्यांसाठी उपलब्ध असू शकतील आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यातील खेळाडूंना सामने खेळण्याची अधिक चांगली संधी मिळेल, याचीही काळजी घेण्यात आली आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1656939326520053761
लीगच्या तारखांना अद्याप वेळ
दरम्यान, बिग बॅश लीगच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, सध्या महिला बिग बॅश लीगमध्ये (Women’s Big Bash League) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शिवाय, बीबीएलचे व्यवस्थापक ऍलिस्टर डॉब्सन यावेळी म्हणाले की, “16 सामने कमी केल्याने आम्ही क्लब आणि चाहत्यांना सर्वोत्तम देण्याचा आमचा उद्देश साध्य करू शकू. एक लीग म्हणून, आम्ही नेहमीच शोधत आहोत की, आम्ही वेळेनुसार कसे नवीन आणि काही गोष्टी विकसित करू शकू.”
मागील वर्षीच कमी करायचे होते सामने
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Latest Austrelia Big Bash League) 2024-25च्या योजनांसह, गेल्या उन्हाळ्यात प्रसारण चर्चेदरम्यान स्पर्धा कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, फॉक्सटेल आणि सेव्हन हे दोन्ही स्थानिक प्रसारक लवकर बदल करण्यास उत्सुक होते, परंतु क्लब प्रायोजकांसह अनेक करार आणि स्थळांच्या व्यवस्थेत बदल आवश्यक होते, असंही यावेळी समोर आलं आहे. (Men’s Big Bash League Latest Update)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जोस बटलरवर बीसीसीआयची मोठी कारवाई! ‘त्या’ कृत्यासाठी बसला ‘एवढा’ मोठा दंड
‘हे’ 6 खेळाडू गुजरातला पोहोचवणार प्ले-ऑफमध्ये? यादीत चार नावे भारतीय






