---Advertisement---

सूर्यकुमारचं शतक खरंच स्पेशल! शतकी खेळीसह राहुलला तर पछाडलच, पण विजय हजारेंचीही केली बरोबरी

On: सोमवार, जुलै 11, 2022 10:43 AM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात रविवारी (१० जुलै) टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. ट्रेंट ब्रिजवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने १७ धावांनी विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला. तरी, या सामन्यात लक्षवेधी ठरला तो भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव. त्याने शतकी खेळी करताना खास विक्रमही रचला आहे. 

या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला संघासमोर २१६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. पण नंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देताना शतक झळकावले. त्याने ५५ चेंडूच ११७ धावा करताना १४ चौकार आणि ६ षटकार मारले.

याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताबाहेर सर्वोच्च धावांची खेळी करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने केएल राहुलने वेस्ट इंडिजविरुद्ध २०१६ साली केलेल्या नाबाद ११० धावांच्या खेळीला मागे टाकले आहे. या यादीत सुर्यकुमार आणि केएल राहुल नंतर तिसऱ्या क्रमांकावर दीपक हुडा असून त्याने काही दिवसांपूर्वीच आयर्लंड विरुद्ध १०४ धावांची खेळी केली होती.

विजय हजारेंची केली बरोबरी
सूर्यकुमारने हे शतक झळकावत विजय हजारे यांच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. सुर्यकुमार यादवचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील देखील पहिले शतक ठरले आहे. त्याने गेल्यावर्षी वयाची ३० वर्षे पूर्ण केल्यानंतर भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. त्यामुळे आता तो भारताकडून वयाच्या तिशी ओलांडल्यानंतर पदार्पण केल्यावर शतक करण्यात यशस्वी ठरलेला तो विजय हजारे यांच्यानंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे.

विजय हजारे यांनी १९४६ साली वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्वर पदार्पण केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ७ शतके झळकावली.

भारताचा सामन्यात पराभव, पण मालिकेत विजय
रविवारी झालेल्या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार व्यतिरिक्त अन्य फलंदाजांना मोठ्या धावा करण्यात अपयश आले. त्यामुळे भारताला २० षटकात ९ बाद १९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्याचमुळे भारताला सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण असे असले तरी, भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकलेले असल्याने मालिकेत २-१ असा विजय मिळवला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

जोकोविचने सातव्यांदा काबिज केले विम्बल्डनचे जेतेपद; ‘या’ यादीत फेडररलाही टाकले मागे

भारतात जन्मलेला, पण इंग्लंडकडून खेळलेला ‘तो’ क्रिकेटर १०० कसोटी खेळणारा बनला होता जगातील पहिलाच खेळाडू

एकच वादा, सूर्या दादा! झंझावाती शतक करत सूर्यकुमारने जिंकली मने, ठरला पाचवाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---