न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाचा अखेरचा सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) ख्राईस्टचर्च येथे सुरू झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाला 219 धावांवर सर्वबाद केले. टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हुकमी एक्का असलेला मध्य फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव हा या सामन्यातही अपयशी ठरला. त्यामुळे वनडे क्रिकेटमधील त्याच्या योगदानाबाबत आता चर्चा होऊ लागली आहे.
मागील दोन वर्षात सूर्यकुमार हा भारताचा प्रमुख टी20 फलंदाज म्हणून समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात त्याने भारतासाठी दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. विश्वचषकाच्या चारच दिवसानंतर सुरू झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावरील टी20 मालिकेतही त्याने शतक साजरे केले होते. मात्र, त्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तो पुरता अपयशी ठरला आहे.
भारतीय संघाने या वनडे मालिकेतील पहिला सामना गमावला होता. त्या सामन्यात सूर्यकुमारने 6 धावा केलेल्या. तर, पावसामुळे रद्द झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याला नाबाद 34 धावांचे योगदान देता आलेले. तर मालिकेतील अखेरच्या व निर्णायक सामन्यात तो केवळ सहा धावा बनवू शकला. यामुळे तो संपूर्ण मालिकेत केवळ 44 धावा बनवण्यात यशस्वी ठरला.
सूर्य कुमारच्या मागील सात वनडे डावांचा विचार केल्यास यातील चार डावांमध्ये तो दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 34 राहिली आहे. त्याच्या आजपर्यंतच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने 15 सामन्यांमध्ये 34.36 च्या सरासरीने 378 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यातील पहिल्या आठ सामन्यांमध्ये त्याची सरासरी 53.8 इतकी जबरदस्त होती. मात्र, त्यानंतर तो कामगिरीत सातत्य ठेवू शकला नाही.
(Suryakumar Yadav Finding Form In ODI Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सॅमसनला वगळल्याने शशी थरूर यांची संघ व्यवस्थापनावर आगपाखड; लक्ष्मण-पंतला धरले धारेवर
पंतच्या उलट्या बोंबा! सतत फ्लॉप ठरल्यानंतर म्हणतोय, “माझी तुलना करू नका”