टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला अमेरिकेकडून एक खास भेट मिळाली आहे. न्यूयॉर्क यँकीज बेसबॉल संघानं सूर्यकुमारचा गौरव केलाय. यँकीज संघानं सूर्यकुमारला संघाची जर्सी भेट दिली, ज्यावर सूर्यकुमारचं नाव आणि त्याचा 63 क्रमांकही लिहिला आहे. अमेरिकेत बेसबॉल खूप लोकप्रिय आहे, मात्र टी20 वर्ल्ड कपपासून क्रिकेटची क्रेझही वाढली आहे.
सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या सूर्यकुमार यादवनं न्यूयॉर्क यँकीजच्या स्टेडियमला भेट दिली. 2024 टी20 विश्वचषकाच्या आयोजनानंतर अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अमेरिकेत क्रिकेटपटूंची ओळख निर्माण होऊ लागली आहे. अमेरिकन नागरिक भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक असलेल्या क्रिकेटला समजून घेऊ लागले आहेत. सूर्यकुमार यादव याचा अशाप्रकारे गौरव होणं, हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे.
Indian T20I Captain Suryakumar Yadav at the home ground of the baseball team “New York Yankees”. 🔥
– Surya was gifted a official jersey of Yankees. pic.twitter.com/Mi8Gpz8tDD
— Johns. (@CricCrazyJohns) August 11, 2024
2024 टी20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. भारतानं न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडियम आणि फ्लोरिडच्या स्टेडियममध्ये सामने खेळले होते. भारतानं पाकिस्तान, आयर्लंड आणि अमेरिकेविरुद्ध सामने खेळले होते, तर कॅनडाविरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे वाहून गेला होता. सूर्यकुमार यादव सध्या श्रीलंकेविरुद्धची टी20 मालिका संपल्यानंतर सुट्या एंजॉय करतोय, ज्यासाठी तो अमेरिकेत आला आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतानं श्रीलंकेचा टी20 मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. या मालिकेपूर्वी बीसीसीआयनं सूर्याला भारतीय टी20 संघाचा कर्णधार बनवलं होतं. या मालिकेत सूर्याची कामगिरी चांगली राहिली होती, ज्यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला होती. मात्र टी20 मालिकेनंतर लगेच झालेल्या एकदिवसीय मालिकेसाठी सूर्या भारतीय संघाचा भाग नव्हता. या मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला.
हेही वाचा –
“मी कोहलीला पाठीशी घालत नाही पण…” श्रीलंकेविरुद्ध गमावलेल्या मालिकेनंतर कार्तिकचा मोठा दावा
नरेंद्र मोदी स्टेडियमचा मान जाणार! भारतात या ठिकाणी बनणार जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम
एकही सुवर्णपदक नाही! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास संपला; एकूण कामगिरी निराशाजनकच