श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्याय टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव वादळी फॉर्ममध्ये होता. सूर्याने या सामन्यात अवघ्या 45 चेंडूत शतक पूर्ण केले. हे त्याच्या टी-20 आंतरारष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले असून संघाची धावसंख्या उंचावण्यासाठी महत्वपूर्ण ठरले. सूर्यकुमारने या शतकीय खेळीच्या जोरावर काही मोठे विक्रम नावावर केले.
कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये शतकांची रांग लावणारे असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी टी-20 फॉरमॅटमध्ये शतक करता आले नाहीये. पण सूर्यकुमा यादव (Suryakumar Yadav) मात्र त्याच्या छोट्या टी-20 कारकिर्दीत तिसऱ्यांदा ही कामगिरी करू शकला. शनिवारी (7 जानेवारी) राजकोटमध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद 112* धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील हे त्याचे तिसरे शतक असून दिग्गजांच्या यादीत त्याचे नाव नव्याने जोडले गेले आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर आला आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा (Sabawoon Davizi) आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जास्त चार वेळा शतकीय खेळी केली आहे. सबावून दाविझी (Sabawoon Davizi) यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दाविझीने कारकिर्दीत तीन टी-20 शतके केले आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो (Colin Munro) यांची नावे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी प्रत्येकी तीन-तीन शतके केली आहेत. सूर्यकुमार यादवने शनिवारी कारकिर्दीतील तिसरे टी-20 शतक केले आणि या दिग्गजांच्या यादीत नव्याने सहभागी झाला.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
4 – रोहित शर्मा
3 – सबावून दाविझी
3 – ग्लेन मॅक्सवेल
3 – कॉलिन मुनरो
3 – सूर्यकुमार यादव
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 228 धावा केल्या. यामध्ये सूर्यकुमारव्यतिरिक्त शुबमन गिल 46, आणि राहुल त्रिपाठी याच्या 35 धावांचा समावेश होता. (Suryakumar Yadav has joined the list of most century scorers in T20 international cricket)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजकोटमध्ये ‘सूर्या’ राजकुमार! श्रीलंकन गोलंदाजांना चोपत झळकावले नाबाद तिसरे टी20 शतक
पाचव्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत 22 संघ सहभागी, स्पर्धेस 8 जानेवारीपासून प्रारंभ