सूर्यकुमार यादव याने 2022 या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. त्यानंतर त्यानेे एकदिवसीय सामन्यातही आपल्या फलंदाजीचा रंग दाखवला. नुकतच त्याने आपल्या या वर्षातील काही आठवणींना उजाळा दिला. सूर्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या सोबत फलंदाजी करत असतानाची एक आठवण बोलून दाखवली आहे. एका सामन्यामध्ये सूर्याने खेळलेल्या एका विलक्षण फटक्यावर विराटने अप्रतिम प्रतिक्रिया दिली होती.
एका सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे फलंदाजी करत होते. त्यावेळी सूर्यकुमार रंगात फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने अशी गोष्ट केेली, ज्यासाठी तो जगभरात ओळखला जातो. त्याने आपल्या 360 डिग्री शैलात एक फटका लगावला. यावर समोर उभ्या असणाऱ्या विराटने त्याला एक जगावेगळी प्रतिक्रिया दिली. त्याने मारलेला फटका पाहून विराट म्हणाला की,”तु व्हिडीओगेम खेळत आहेस का? काहीतरी वेगळच चालू आहे तुझे” ही गोष्ट ऐकून सूर्याला चांगलाच आनंद झाला.
टी20 विश्वचषकात आपल्या विचित्र फटक्यांनी विरोधी गोलंदाजांना हैराण करुन सोडणारा सूर्या म्हणाला की, “मी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये एकसारखे शॉट खेळत आलोय, परंतू जेव्हा मी आंतरराष्ट्रीय स्तरावर असे शॉट खेळण्यात यशस्वी झालो, तेव्हा मलाही आश्चर्य झाले. पुढच्या दिवशी मी मागच्या तीन महिन्यातील माझ्या फलंदाजीचे व्हिडीओ पाहिले. तेव्हा मी स्वत:शीच म्हणालो की, अरे! मी असा कसा खेळत होतो.”
आधी टी20 आणि एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांची झोप उडवणाऱ्या सूर्याची नजर आता कसोटी क्रिकेटवर आहे. भारताच्या कसोटी संघात प्रवेश मिळवण्यासाठी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये स्वत:ला परखण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा हा मधल्या फळीतील खेळाडू हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसला. या सामन्यात अर्धशतक लगावत सुरुवात केली. सामन्याच्या आधी सूर्याने आपल्या मागील 6 महिन्यांमधील मैदानावरील अनुभवांविषयी मोकळेपणाने भाष्य केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या ‘व्हाईटवॉश’ जखमेवर या क्रिकेट संघाने चोळले मीठ! ट्वीटमध्ये लिहिले, ‘आम्ही पराभवास…’
पाकिस्तानचा डब्ल्यूटीसीमधून खेळ खल्लास, ‘हे’ चार संघ अजूनही गाठू शकतात फायनल