देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy 2022-23) वारे जोरात वाहत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू्ंनी या स्पर्धेच्या 2022-23च्या हंगामात पुनरागमन केले आहे. यातील एक म्हणजे भारताचा मिस्टर 360 डिग्री अर्थातच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). तो तीन वर्षानंतर रणजी ट्रॉफीमध्ये परतला आहे. त्याने मुंबईमध्ये संघपुनरागमन करताच पहिल्या डावामध्ये 100 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याची ही विशेष खेळी पाहून चाहते मात्र काहीसे नाराज झाले आहेत.
मुंबई विरुद्ध हैद्राबाद (MUMvsHYD) यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना 20 डिसेंबरपासून खेळला जात आहेत. यामध्ये हैद्राबादने नाणेफेक जिंकत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईला पहिले फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. मुंबईचा संघ पाहिला की त्यांच्यात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. रहाणे-सूर्यकुमारबरोबर संघात पृथ्वी शॉ, सरफराज खान आणि यशस्वी जायसवाल यांचा समावेश आहे.
झाले असे की, मुंबईचा पहिला डाव सुरू असताना सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी त्याच्याकडून पुन्हा एकदा टी20 सारखी फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने 80 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने 90 धावा केल्या. तो शतकाला मुकला यामुळे त्याचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. त्याला एम शशांकने पायचीत केले. तो बाद झाल्यावर मुंबईची स्थिती 176 धावांवर 2 विकेट्स अशी झाली.
सूर्यकुमारने टी20मध्ये भारताकडून अनेक स्फोटक खेळ्या खेळताना तो त्या प्रकारामध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवून दिले आहे. तो टी20मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाजीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मात्र त्याला क्रिकेटमधील दिर्घ प्रकार म्हणजेच कसोटी क्रिकेट हृद्याच्या जवळ असल्याचे म्हटले आहे. दिर्घ काळानंतर तो या प्रकारात खेळत असल्याने त्याला विविध शॉट्स खेळताना अडचण आली नाही, असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.
रणजी ट्रॉफीच्या या हंगामातील दुसऱ्या राऊंडमध्ये सूर्यकुमारबरोबरच संजू सॅमसन, युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर असे अनेक खेळाडू आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या राऊंडमध्ये मुंबईने आंध्र प्रदेशला पराभूत केले होते, तर दुसरीकडे हैद्राबादचा पहिला सामना तमिळनाडू विरुद्ध झाला. जो अनिर्णीत राहिला. Suryakumar Yadav makes 90 runs for mumbai first innings in Ranji Trophy 2022-23
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या ‘व्हाईटवॉश’ जखमेवर या क्रिकेट संघाने चोळले मीठ! ट्वीटमध्ये लिहिले, ‘आम्ही पराभवास…’
पाकिस्तानचा डब्ल्यूटीसीमधून खेळ खल्लास, ‘हे’ चार संघ अजूनही गाठू शकतात फायनल