Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूर्याच्या टप्प्यात आला आणखी एक विक्रम! झिम्बाब्वेविरूद्ध चालून आली संधी

November 5, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Suryakumar-Yadav

Phot Courtesy; Twitter/T20WorldCup


टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील शेवटचे 3 सामने रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) खेळले जाणार आहेत. यातील तिसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न येथे पार पडणार आहे. भारतीय संघाला अधिकृतपणे उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. त्याचवेळी भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याला या सामन्यात एक मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार या विश्वचषकात भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी नेदरलँड्स व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार अर्धशतके ठोकली होती. त्यानंतर बांगलादेश विरुद्ध देखील त्याने केवळ 16 चेंडूंवर 30 धावा चोपलेल्या. टी20 विश्वचषकात सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावणारा तो केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे.

झिम्बाब्वेविरूद्ध या सामन्यात सूर्यकुमार एक मोठा विक्रम आपल्या नावे करू शकतो.‌ सूर्यकुमारने या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये 965 धावा केल्या आहेत. त्यामुळे वर्षभरात 1000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ 35 धावांची गरज आहे. झिम्बाब्वेविरूद्ध त्याने या 35 धावा केल्यास टी20 क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा फलंदाज बनेल.

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने यापूर्वी अशी कामगिरी करून दाखवली आहे. 2021 मध्ये रिझवानने 1326 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव सध्या फलंदाजांच्या जागतिक टी20 क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. अव्वल स्थान गाठणारा तो विराट कोहलीनंतर केवळ दुसरा भारतीय आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लॉप ठरूनही कार्तिकला मिळाला भारतीय दिग्गजाचा भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘इतर खेळाडूही फ्लॉप…’
श्रीलंकेला नमवत इंग्लंड सेमी-फायनलमध्ये! यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात


Next Post
Zimbabwe Cricket Team

पाकिस्तानला हरवल्यानंतर झिम्बाब्वेचा जोश भलताच वाढलाय; कॅप्टन म्हणाला, 'विराटला आऊट करण्याची...'

aus vs afg

वर्ल्डकपमधून ऑस्ट्रेलियाची एक्झिट होताच मॅक्सवेलची आपल्याच संघाविरुद्ध तिखट प्रतिक्रिया; म्हणाला...

Photo Courtesy:Twitter/SLC

बिग ब्रेकिंग! श्रीलंकन क्रिकेटपटूला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनीतून अटक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143