भारतीय संघ आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा क्रिकेटपटू सुर्यकुमार यादवला मर्यादित षटकांच्या संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, मंगळवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून सूर्यकुमारला कोणत्याही संघात स्थान देण्यात आले नाही.
३० वर्षीय सूर्यकुमार संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात कमालीचे प्रदर्शन करताना दिसत आहे. या हंगामात तो मुंबई इंडियन्सचा सदस्य असून त्याने आतपर्यंत ११ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २ अर्धशतकांच्या मदतीने २८३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने मागील काही महिन्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एवढेच नव्हे तर त्याने भारत अ संघाकडूनही चांगली कामगिरी केली आहे.
मात्र बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी, वनडे आणि टी२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात नियुक्ती न केल्यामुळे, त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाच्या आशा पुन्हा धूसर झाल्या आहेत. त्याची टीम इंडियात निवड होण्याची मोठी चर्चा होती. पाठीमागे रोहितनेही सुर्यकुमार लवकरच भारतीय संघात येण्याबद्दल भाष्य केले होते.
मुंबई रणजी संघातील एक मोठा खेळाडू म्हणून सुर्यकुमारची ओळख आहे. जवळपास ११ वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजविणाऱ्या सुर्यकुमारची भारताकडून खेळण्याची प्रतिक्षा आजही संपलेली नाही.
सप्टेंबर महिन्यात आपला ३०वा वाढदिवस साजरा केलेल्या सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत तर ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात त्याने १६० सामन्यात ३१.३८च्या सरासरीने ३२९५ धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये ९६ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने २८.५५च्या सरासरीने १८२७ धावा केल्या आहेत.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
-तीन वर्षांपूर्वी खास धोनीला खेळताना पाहण्यासाठी यायचा स्टेडियममध्ये; त्यानेच केली दांडी गुल
-दिनेश कार्तिकची ‘ही’ रणनीती धोनीच्या चेन्नईला पडली भलतीच महागात
-राजस्थानची विजयाची हॅट्रिक हुकली, कोलकाताचा राजस्थानवर ‘राॅयल’ विजय
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’






