2022च्या वर्षाअखेरीस भारतीय पुरूष क्रिकेट संघात अनेक मोठे आणि धक्कादायक बदल पाहायला मिळाले आहेत. मंगळवारी (27 डिसेंबर) भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी टी20 आणि वनडे संघ जाहीर केला. यामध्ये निवडकर्त्यांनी टी20मध्ये युवा खेळाडूंना संधी दिली आहे. ही मालिका 3 जानेवारीपासून सुरू होणार असून या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे, तर उपकर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याची निवड करण्यात आली. सूर्यकुमारला उपकर्णधार केल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होती, हे समोर आले आहे.
या मालिकेमधून रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) या वरिष्ठ खेळाडूंना वगळले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहे. मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता सूर्यकुमार पत्रकारांना सामोरा गेला. त्यामध्ये त्याने उपकर्णधारपदाबाबत बोलताना म्हणाला, “मला उपकर्णधार केले जाईल अशी अपेक्षाच नव्हती. मी यावर्षी फलंदाजीत जी कामगिरी केली कदाचित त्याचेच फळ म्हणून मला हे पद दिले असावे. मी ही जबाबदारी सांभाळण्यास उत्सुक आहे.”
सूर्यकुमारला त्याच्या वडीलांनी संघाची यादी मोबाईलवर पाठवली होती. तेव्हा त्याला उपकर्णधार केले गेले यावर विश्वासच बसत नव्हता. त्यावर तो म्हणाला, “माझे वडील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून त्यांच्याकडूनच मला हे कळाले. तेव्हा त्यांनी असेही म्हटले की, मी जबाबदारीचा दबाव न घेता नेहमीप्रमाणे चांगली फलंदाजी करत रहावे.”
यावर्षी सूर्यकुमार टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने यावर्षी 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 46.56च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. त्याने 2 शतके आणि 9 अर्धशतकांच्या सहाय्याने 1164 धावा केल्या आहेत. 32 वर्षीय सुर्यकुमारने 2021मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. Suryakumar Yadav’s reaction after becoming the vice-captain of India’s T20 team, INDvsSL series
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने भारताला फायदा, सलग दुसऱ्यांदा खेळणार कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये!
भारताच्या वनडे संघातून बाहेर झाल्याने निराश ‘गब्बर’! इमोशनल पोस्ट व्हायरल