सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं चौथ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला. या सामन्यात टीम इंडियानं 135 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 1 गडी गमावून 283 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ 148 धावांत गडगडला. या विजयासह सूर्यकुमार यादवनं कर्णधार म्हणून आपला विक्रम कायम ठेवला आहे.
(5) ऑस्ट्रेलियाला 4-1 ने पराभूत केले – गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळवण्यात आली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ही पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. त्या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार होता.
(4) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अनिर्णित – सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गेल्या वर्षी टी20 मालिका खेळली गेली, जी 1-1 ने बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेनं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताचा एका सामन्यात पराभव केला होता. भारतानं एक सामना जिंकला होता तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
(3) श्रीलंकेवर 3-0 ने मात – गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा होता. दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतानं तिन्ही सामन्यांमध्ये जबरदस्त विजय मिळवला होता.
(2) बांगलादेशचा 3-0 ने पराभव – यावर्षी 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली, ज्यामध्ये टीम इंडियानं बांगलादेशला तिन्ही सामन्यांमध्ये दारुण पराभूत केलं. तिसऱ्या टी20 मध्ये भारतानं 133 धावांनी विजय मिळवला होता.
(1) दक्षिण आफ्रिकेला 3-1 ने पराभूत केले – सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट टी20 मालिका विजय म्हणता येईल. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर 3-1 नं पराभूत केलं. चौथ्या टी20 सामन्यात भारतानं 283 धावा करत नवा विक्रम प्रस्थापित केला.
हेही वाचा –
IND VS SA; संजू-तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक दोन नव्हे तर चक्क इतके विक्रम मोडले
संजू सॅमसनच्या शॉटमुळे महिला जखमी झाली, थेट गालावरचा लागला चेंडू!
IND vs SA: संजू सॅमसन नाही तर या खेळाडूने केल्या सर्वाधिक धावा, जाणून घ्या कोणी सर्वाधिक विकेट घेतल्या?