पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 मधील त्यांच्या मोहिमेची सुरुवात 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यानं केली. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला 6 धावांनी पराभव पत्कारावा लागला. आता त्यांचा पुढील सामना 27 मार्च रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आहे. परंतु त्या आधीच संघाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू आणि मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला एनसीएनं दुसऱ्या फिटनेस चाचणीनंतरही क्लीन चिट दिलेली नाही. त्यामुळे आता गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना मिस झाल्यानंतर सूर्यकुमार यादव हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही खेळू शकणार नाही.
रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या फिटनेस चाचणीनंतरही सूर्यकुमार यादवला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून खेळण्यासाठी क्लीन चिट मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये सूर्यकुमारची दुसरी फिटनेस चाचणी 21 मार्च रोजी घेण्यात आली होती. त्याची पुनर्वसन प्रक्रिया सुमारे 2 आठवड्यांपूर्वी सुरू झाली. परंतु दोनदा फिटनेस चाचणी प्रक्रियेतून गेल्यानंतरही त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच टी-20 विश्वचषकही फार दूर नसल्यामुळे बीसीसीआयला त्याच्या फिटनेसबाबत घाईघाईनं निर्णय घ्यायचा नाही.
सूर्यकुमार यादवला काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. यादव ‘हर्निया’ नावाच्या समस्येनं त्रस्त असल्याचं सांगण्यात आलं. याच्या उपचारासाठी तो जर्मनीला गेला होता. जानेवारी महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला एक महिना लागू शकतो, असा अंदाज होता. परंतु आता बराच काळ झाला तो मैदानापासून दूर आहे.
सूर्यकुमार यादवचा आयपीएलमधील रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यानं आयपीएलमध्ये 139 सामन्यांच्या 124 डावांमध्ये 3249 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 31.85 आणि स्ट्राईक रेट 143.32 राहिला. 103 ही त्याची आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमारच्या नावे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 4 शतकं आहेत. तो गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
समालोचकानं आरसीबीच्या गोलंदाजासाठी वापरला ‘कचरा’ शब्द, संघाकडून जोरदार प्रत्युत्तर
सेम टू सेम! स्टेडियममध्ये दिसला शिखर धवनचा डुप्लिकेट, विराटला हसू आवरेना!
जुनं ते सोनं! क्रिकेटपटू ते समालोचक अन् आता फिनिशर; अशी आहे दिनेश कार्तिकची कारकीर्द