---Advertisement---

सूर्यकुमारने चहलच्या बायकोसोबत शेअर केला फोटो, कॅप्शन लिहीत ‘युझी’ला केलं ट्रोल

On: शनिवार, ऑगस्ट 13, 2022 7:39 PM
---Advertisement---

सूर्यकुमार यादव सध्या आशिया चषकापर्यंत क्रिकेटमधून विश्रांती घेत आहेत. त्याने अलीकडेच युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यरला त्याच्या घरी बोलावले होते. टीम इंडियाच्या स्टार बॅट्समनने इन्स्टाग्रामवर पत्नी देवीशा शेट्टी, श्रेयस अय्यर आणि धनश्रीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि युजवेंद्र चहललाही ट्रोल केले.

सूर्यकुमार यादवने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सूर्यासोबत त्याची पत्नी देविशा, श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माही दिसत आहेत. हा फोटो शेअर करत सूर्यकुमारने लिहिले की, “सॉरी युजवेंद्र चहल… आम्ही तुम्हाला मिस करत नाही.” चहल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि लेग-स्पिनरने त्याच्या सहकारी खेळाडूला प्रतिसाद देणे अपेक्षित आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांना विश्रांती देण्यात आली आहे. हे त्रिकूट १७ जून रोजी संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मर्यादित षटकाच्या मालिकेचा भाग होते. इंग्लंड मालिकेनंतर, खेळाडू ३ वनडे आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वेस्ट इंडिजला गेले. अय्यर आणि सूर्यकुमार यांचाही टी-२० संघात समावेश करण्यात आला होता, तर चहलला विश्रांती देण्यात आली होती.

युझवेंद्र चहलचे झिम्बाब्वे दौऱ्यावर पुनरागमन अपेक्षित होते मात्र त्याला दीर्घ विश्रांती देण्यात आली आहे. चहल आणि सूर्यकुमार हे आशिया चषक २०२२च्या संघाचा भाग असून पुढील आठवड्यात ते यूएईला रवाना होतील. तर, अय्यरला राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले आहे.

सध्या चहल आणि सूर्यकुमार २०२२च्या टी-२० विश्वचषक संघात निश्चित निवड झाल्याचे दिसत आहे. चहलकडे गेल्या वर्षीच्या आयसीसी स्पर्धेतही निश्चित निवड म्हणून पाहिले जात होते पण आश्चर्यकारकपणे त्याला संघातून वगळण्यात आले होते. अय्यर गेल्या वर्षीच्या स्पर्धेत राखीव खेळाडूंच्या यादीत होते. खचाखच भरलेल्या मधल्या फळीत पुन्हा एकदा अय्यरची उणीव भासू शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

कॉमनवेल्थ गेम्समधील विजेत्यांना भेटले पंतप्रधान; म्हणाले, ‘देश तुमच्यासाठी रात्र-रात्र जागलाय’

आयपीएल सामन्यावेळी संघमालकाने रॉस टेलरच्या कानशिलात लगावलेली! आता स्वत:च केलाय खुलासा

टीम इंडियाला मिळाला नवा बॅटींग कोच! विश्वचषक मिळवून देणारा पठ्ठ्या देणार भारतीय फलंदाजांना प्रशिक्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---