---Advertisement---

कॉमनवेल्थ गेम्समधील विजेत्यांना भेटले पंतप्रधान; म्हणाले, ‘देश तुमच्यासाठी रात्र-रात्र जागलाय’

On: शनिवार, ऑगस्ट 13, 2022 7:03 PM
narendra modi Athletes
---Advertisement---

नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन चांगले राहिले. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकूण ६१ खेळाडूंनी यावर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे. शनिवारी (१३ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंतर केले. सर्व खेळाडूंवर संपूर्ण देशाला अभिमान आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नेरंद्र मोदी (Narendra Modi) खेळाडूंविषयी बोलताना म्हणाले की, तुम्हा एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे मला भेटण्यासाठी याठिकाणी आलात. तुमच्या प्रत्येक यशावर मला अभिमान आहे. दोन दिवसांनंतर देश स्वतंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करणार आहे. देश तुमच्या सर्वांची मेहनत आणि प्रेरणादायक उपलब्धीसह स्वातंत्र्याच्या अमृतमुहत्सवात प्रवेश करत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कॉमनवेल्थ गेम्सच्या ऐतिहासिक प्रदर्शनानंतर देशाने पहिल्यांदाच चेस ऑलंपियाडचे आयोजन केले. माला पूर्ण आत्मविश्वास होता की, तुम्ही जिंकून परत याल. मी ठरवलेच होते की, तुमच्यासोबत विजयाचा उत्सव साजरा करेल.

मोदी पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही तिकडे (इंग्लंडमध्ये) खेळत होतात, इथे करोडो भारतीय तुमच्यासाठी रात्र-रात्र जागत होते, जेणेकरून तुमचे प्रदर्शन आणि गुणतालिका पाहू शकतील. यावर्षी भारताने केलेले प्रदर्शन पदकांच्या संखेवर समजू शकणार नाही. प्रत्येक खेळाडूने पूर्ण प्रयत्न केला आहे. हॉकीच्या दोन्ही (पुरुष आणि महिला) संघांनी यावर्षी त्यांची प्रथा पुढे कायम ठेवली आहे. यावर्षी आपल्याला चार नवीन खेळांमध्ये पदक मिळाले आहे. युवा खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला. पदार्पण करणाऱ्या ३१ खेळाडूंनी यावर्षी मेडल जिंकले. मोदी पुढे असेही म्हणाले की, भारतासाठी खेळाचा सुवर्णकाळ दरवाजा ठोठावत आहे.

दरम्यान, यावर्षी खेळल्या गेलेल्या कॉमनवेल्थ गेम्स ८ ऑगस्ट रोजी संपल्या आहेत. २०२२ हंगामात भारताच्या पारड्यात एकूण ६१ पदके आली असून त्यातील २२ पदके ही सुवर्ण आहेत. त्याचसोबत १२ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा यामध्ये समावेश आहे. स्पर्धेत भारत सर्वाधिक पदके जिंकणारा चौथा देश ठरला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

BREAKING। भारताशी दोन हात करायला बांग्लादेशचा संघ जाहिर! अनपेक्षित खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा

टीम इंडियाला मिळाला नवा बॅटींग कोच! विश्वचषक मिळवून देणारा पठ्ठ्या देणार भारतीय फलंदाजांना प्रशिक्षण

‘आमच्या खेळाडूंना आयपीएलमुळेच बाकीच्या टी२० लीगमध्ये नो एंट्री’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---