यंदाच्या टी20 विश्वचषकाची (T20 World Cup) सुरुवात 2 जूनपासून होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ टी20 विश्वचषकासाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. भारतीय संघाचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला आहे. भारत त्यांचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ न्यूयाॅर्कमध्ये सराव करत आहे. परंतु मोकळ्या वेळात भारतीय खेळाडू फिरताना दिसत आहेत.
भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं (Yashasvi Jaiswal) त्याच्या इंस्टाग्रामवर फिरत असतानाचे 2 फोटो शेअर केले आहेत. भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) त्याच्या पोस्टवर कमेंट करत लिहलं की, “संभल के. गार्डन में घूमेगा तो पता है ना…” यावर भारतीय चाहत्यांना समजलं की याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं भारतीय खेळाडूंना ताकीद दिली होती. याची आठवण करुन देत सुर्यकुमार यादवनं यशस्वी जयस्वालची थट्टा केली.
View this post on Instagram
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान रोहितनं भारतीय खेळाडूंना म्हंटल होत की, गार्डनमध्ये फिरताना मला कोणी दिसलं नाही पाहिजे. यशस्वीच्या पोस्टवर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यानं कमेंट केली की, “जवान.” तर एका इंस्टाग्राम युजरनं लिहलं की, “गार्डनमध्ये फिरु नकोस भावा रोहित कर्णधार आहे.”
आतापर्यंत यशस्वी जयस्वाल 17 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्यानं 161.9 च्या स्ट्राईक रेटनं 502 धावा ठोकल्या आहेत. ज्यामध्ये 4 अर्धशतकासह 1 शतकाचा समावेश आहे. 17 टी20 सामन्यांमध्ये त्यानं 28 षटकार तर 55 चौकार लगावले आहेत. आयपीएल 2024 च्या हंगामात तो राजस्थानं राॅयल्स संघाचा भाग होता. आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना त्यानं 15 सामन्यांमध्ये 155.91 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत 435 धावा ठोकल्या.
महत्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आईएसआईएस (ISIS) कडून मिळाली धमकी
बाबर आझम मोडणार का कोहलीचा विक्रम? बाबरला आज सुवर्णसंधी, जाणून घ्या बातमीद्वारे
टी 20 विश्वचषकापूर्वी सूर्या चमकला! आयसीसीच्या “टी 20 क्रिकेटर ऑफ द ईयर” पुरस्काराने सन्मानित