भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव संघासोबत बांगलादेश दौऱ्यात संघासोबत नाहीये. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने मागच्या काही महिन्यांमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. तो आता भारतीय संघाचा महत्वाचा सदस्य बनला असला, तरीही बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला विश्रांती दिली गेली आहे. मात्र, या मोकळ्या वेळात देखील सूर्या शांत बसणार नाहीये. तो लवकरच मुंबई संघासाठी रणजी सामन्यात खेळताना दिसणार आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) बांगलादेश दौऱ्यापूर्वी लागोपाठ 75 दिवस भारतीय संघासोबत होता. अशात बांगालदेश दौऱ्यात संघ व्यवस्थापनाकडून त्याला विश्रांती दिली गेली. पण सूर्याला मात्र या विश्रांतीची गरज नसल्याचेच दिसत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सूर्यकुमार मुंबई संघाचा महत्वाचा फलंदाज राहिला आहे. येत्या 20 डिसेंबरपासून मुंबई संघाला हैदराबादविरुद्ध रणजी सामना खेळायचा आहे. या सामन्यात खेळण्यासाठी सूर्यकुमार यादव उबलब्ध असणार आहे.
एमसीएचे वरिष्ठ अधिकाऱी अजिंक्य नायक यांनी माध्यमांना याविषयी माहिती दिली. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “सूर्याने आम्हाला सांगितले आहे की, तो दुसर्या रणजी सामन्यासाठी उपलब्ध असेल. आंध्र प्रदेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी निवड समितीने आज (5 डिसेंबर) संघ घोषित केला. संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अजिक्य रहाणे याच्या खांद्यावर असेल.”
सूर्यकुमार यादव भारततीय संघासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडत असला, तरीही कसोटी क्रिकेटमध्ये मात्र त्याला अद्याप संधी मिळाली नाहीये. अशात मर्यादित षटकांमध्ये धमाकेदार प्रदर्शन करणारा सूर्यकुमार लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये चांगल्या प्रदर्शनासाठी प्रयत्न करेल. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि हैदराबाद यांच्यात 20 डिसेंबर रोजी सुरू होणारा रणजी सामना त्याच्यासाठी महत्वाचा असेल.
सूर्यकुमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने 32 वर्षाीय फलंदाजाने पहिला आंतरराष्ट्रीय सामना 2021 मध्ये खेळला होता. पदार्पणापासून आजपर्यंत त्याने भारतासाठी एखूण 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने 384 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याला आतापर्यंत 42 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये 44 च्या सरासरीने 1408 धावा केल्या आहेत. चाहते त्याच्या कसोटी पदार्पणासाठी वाट पाहत आहेत. (Suryakumar Yadav, who is on leave from the national team, is ready to play domestic cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला हरवल्यावर बांगलादेशच्या कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला,’आम्हाला वाटलं होत..’
डेक्कन ग्लॅडिएटर्स टी10 लीगचा चॅम्पियन! रैनाच्या गळ्यात विजेतेपदाची आणखी एक माळ