---Advertisement---

BREAKING: सूर्या बनला 2022 आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द इयर; तीन दिग्गजांना मागे टाकत उमटवली मोहोर

On: बुधवार, जानेवारी 25, 2023 4:22 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसी सध्या 2022 या वर्षांचे आयसीसी पुरस्कार जाहीर करत आहे. आयसीसीने बुधवारी (25 जानेवारी) मागील वर्षीचा सर्वोत्तम टी20 खेळाडू हा पुरस्कार जाहीर केला. भारताचा मधल्या फळीतील फलंदाज व सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादव ‌ याने हा पुरस्कार आपल्या‌ नावे केला. त्याने झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, इंग्लंडचा सॅम करन व पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यांना मागे टाकत‌ या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयसीसीने आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली. नववर्षाच्या सुरुवातीलाच या पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर करण्यात आलेली. वर्षातील सर्वोत्तम टी20 क्रिकेट म्हणून सूर्यकुमार यादव याच्यासह ‌‌ रझा, रिझवान व करन यांना नामांकन लाभलेले. मात्र, अखेरीस सूर्यकुमारने या पुरस्कारावर कब्जा केला.‌

अवघ्या दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केलेल्या सूर्यकुमारने मागील वर्षी टी20 क्रिकेटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने वर्षभरात 31 सामने खेळताना 46.56 च्या विस्मयकारक सरासरीने व 187 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने तब्बल 1164 धावा कुटल्या.‌ यामध्ये दोन शतके व‌ 9 अर्धशतकांचाही समावेश होता. तसेच, 68 उत्तुंग षटकारही त्याने खेचलेले.

टी20 क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा करणारा तो‌ केवळ दुसरा फलंदाज बनलेला. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण फलंदाजीने त्याने टी20 विश्वचषकातही उल्लेखनीय कामगिरी केली.‌ विराट कोहलीनंतर तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टी20 संघातही त्याची वर्णी लागली आहे.

(Suryakumar Yadav Won ICC T20 Cricketer Of The Year 2022)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---