आशिया चषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले. भारतीय संघाच्या विजयाचा नायक मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ठरला. त्याने 26 चेंडूत नाबाद 68 धावा करत हाँगकाँगच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सूर्यकुमारला त्याच्या वादळी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या शानदार खेळीनंतर सूर्यकुमार पत्रकार परिषदेत पत्रकारांना सामोरा गेला. त्या पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने त्याला असा प्रश्न विचारला, जो ऐकून सूर्यकुमारला हसू अनावर झाले.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने विचारलेला प्रश्न ऐकून सूर्यकुमार हसू फुटले. पाकिस्तानी पत्रकाराने सूर्यकुमारला विचारले, ‘रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही संपूर्ण आशिया चषकामध्ये विविध प्रयोग करत राहू. रोहित शर्मासोबत पुढच्या सामन्यात तु देखील सलामीला आल्यास तो एक प्रयोगाचा भाग समजावा का?
हा प्रश्न ऐकून सूर्यकुमारला हसू आवरले नाही. त्याने प्रतिप्रश्न करत विचारले की, ‘म्हणजे तुम्ही म्हणताय की केएल भाईला खेळवायचे नाही? तो दुखापतीनंतर पुनरागमन करत असून, त्याला थोडा वेळ हवा आहे. मी म्हटल्याप्रमाणे, मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे. मी कुठेही फलंदाजी करेल. मला फक्त खेळायला द्या, असे मी प्रशिक्षक आणि कर्णधाराला सांगितले आहे.
सूर्यकुमारने या सामन्यात नेत्रदीपक फटकेबाजी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने अवघ्या 26 चेंडूत 68 धावा कुटल्या. यात सहा चौकार व सहा षटकारांचा समावेश होता. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सर्वात कमी सामन्यात पाच सामान्य पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय बनला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हाँगकाँग विरुद्ध तळपला सूर्या! कॅप्टन रोहितला मागे टाकत केली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी
श्रीलंका वि. बांगलादेश संघात ‘करा वा मरा’ची लढत, जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार