---Advertisement---

‘विराट कोहली तर साक्षात देव!’ सुर्यकुमार यादवचा ४ वर्षांपुर्वीचा ट्विट जोरदार व्हायरल

On: शुक्रवार, ऑक्टोबर 30, 2020 9:11 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये बुधवारी (28 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुबंई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली होती. अशातच, सूर्यकुमार यादवचे 4 वर्षापूर्वीचे ट्विट व्हायरल होतं आहे, ज्यामध्ये त्याने विराट कोहलीला देवाची उपमा दिली होती.

सन 2016 मध्ये सूर्यकुमार यादवने केलं होतं ट्विट
सूर्यकुमार यादवने मार्च 2016 मध्ये विराटचा फोटो शेअर करत एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्याने लिहिलं होतं की, “ सामन्यादरम्यान जेव्हा जबाबदारी असते आणि दबाव असतो, त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर मी देवाला फलंदाजी करताना पाहिलं आहे.”

आधी या दोन खेळाडूंमध्ये खुन्नस पाहायला मिळाली. त्यानंतर लगेच सूर्यकुमारने विराटची प्रशंसा केल्याचं ट्विट व्हायरल झालं. त्यामुळे या ट्विटची क्रिकेटप्रेमींमध्ये बरीच चर्चा होतं आहे.

सामन्यादरम्यान पाहायला मिळाली खुन्नस

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार १३ व्या षटकात ४० धावांवर फलंदाजी करत होता. त्याचवेळी विराट आणि त्याच्यामध्ये खुन्नस पहायला मिळाली. झाले असे की हे षटक वेगवान गोलंदाज डेल स्टेन टाकत होता. त्याच्या ५ व्या चेंडूवर सुर्यकुमारने चौकार ठोकला होता. तर शेवटच्या चेंडूवर सुर्यकुमारने कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. यावेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने तो चेंडू लगेच पकडला. त्यामुळे सुर्यकुमारला धाव घेता आली नाही. मात्र, विराटने चेंडू पकडल्यानंतर तो सुर्यकुमार यादवच्या दिशेने चालत येत असलेला दिसला.
यावेळी विराट सुर्यकुमारकडे भेदक नजरेने पाहात असल्याचेही दिसले. त्यावर सुर्यकुमारनेही विराटवरील नजर हाटवली नाही. त्यानेही त्याच्याकडे नजर रोखून ठेवली. यानंतर विराट सुर्यकुमारच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्यानंतर लगेचच सुर्यकुमार तिथून काहीही न बोलता निघून गेला.

https://twitter.com/vishalghandat1/status/1321498783461502976?s=19

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट तिसऱ्या क्रमांकावर करतो फलंदाजी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. या क्रमांकावर त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. एवढेच नव्हे, तर त्याने स्वतःच्या बळावर भारतीय संघाला अनेक सामनेही जिंकवून दिले आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---