‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ फेम दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा आज (२१ जानेवारी) ३६ वा वाढदिवस आहे. त्यामुळे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या अनेक आठवणींवर त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकली जात आहे.
सुशांतने त्याच्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यातील त्याची मुख्य भूमिका असलेला ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट चांगला गाजला होता. या चित्रपटानंतर त्याच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली होती. या चित्रपटानंतर त्याला काही मोठे चित्रपट मिळाले. यात केदारनाथ, छिछोरे असे काही चित्रपट आहेत.
‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटात सुशांत धोनीच्या भूमिकेत दिसला होता. या भूमिकेसाठी त्याने २ कोटी रुपये मानधन घेतले होते.
या चित्रपटासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती. अगदी तो टीसीचे काम शिकण्यासाठी धोनी ज्या रेल्वे क्वार्टरमध्ये रहायचा तिथेही भेट देऊन आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सुशांतने त्याची भविष्यातील चित्रपटांसाठी फी देखील वाढवली होती. काही रिपोर्ट्सच्या नुसार त्याने या चित्रपटानंतर त्याच्या फीमध्ये दुप्पट वाढ केली होती. त्याची पुढील काही चित्रपटांसाठी ३.५ ते ४ कोटी रुपयांच्या फीची मागणी होती. याबद्दल त्यावेळी काही निर्मात्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीचा टीसी असतानाचा रोल परफेक्ट जमावा, म्हणून कष्टाळू सुशांतने खरोखर केले होते टीसीचे काम
वेंकटेशला मिळणार डच्चू? दुसर्या वनडेत अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन
केव्हा, कुठे आणि कधी रंगणार दक्षिण आफ्रिका-भारत दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही