सागर राणा या २३ वर्षांच्या कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेते सुशील कुमार यांच्या खटल्याची सुनावणी करण्यापासून माध्यमांना रोखण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य केली. मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली असून, शुक्रवारी (२८ मे) रोजी न्यायालय या खटल्याची सुनावणी घेईल.
ही याचिका कायद्याच्या विद्यार्थ्याने दाखल केली आहे. छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या वादाच्या संदर्भात मीडियाने त्यांच्याविरोधात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कुमार यांची कारकीर्द व प्रतिष्ठा डागाळल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेनुसार न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वी संशयिताचा माध्यमांमध्ये जास्त प्रचार केल्याने एकतर वाजवी खटला कमी होतो. सुशील कुमार यांना सह-आरोपी अजयसोबत दिल्ली शेजारील मुंडका येथून २३ मे रोजी अटक केली गेली.
दिल्लीच्या कोर्टाने शहरातील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूच्या मृत्यूच्या आरोपाखाली अटक केलेले कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदकविजेते सुशील कुमार यांना सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सहकारी कुस्तीगीर सागर राणा आणि त्याचे दोन मित्र सोनू आणि अमित कुमार यांच्यावर ४ मे रोजी स्टेडियमवर हल्ला केला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सागर याने नंतर रुग्णालयात आपला जीव सोडला होता.
दिल्ली पोलिसांनी कलम ३०२ (खून), ३०८ (हेतुपुरस्सर खून), ३६५ (अपहरण), ३२५ (गंभीर दुखापत), ३२३ (स्वेच्छेने जखमी), ३४१ (चुकीच्या पद्धतीने अडविणे) आणि ५०६ (धमकी देणे) या कलमान्वये प्राथमिक तक्रार तर, आयपीसीच्या कलम २६९ (रोगाचा संसर्ग पसरवण्यासाठी निष्काळजीपणाने वागणे), १२०-बी (गुन्हेगारी कट रचणे) आणि ३४ (सामान्य हेतू) तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत असलेल्या विविध कलमांचादेखील समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कमालीची डेरिंग! ‘असे’ ५ करारबद्ध क्रिकेटपटू, ज्यांनी त्यांच्याच बोर्डाशी घेतली पंगा
स्टुअर्ट ब्रॉडच्या होणाऱ्या नवरीची मोठी इच्छा; म्हणे, ‘मोठं कुटुंब पाहिजे, मुलं घरभर फिरतील’