दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये दंगल न करता मोठा दंगा झाला होता. यामध्ये प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारवर ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गेली अनेक दिवस फरार असलेल्या सुशीलला दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांना पकडण्यात अखेर यश आले आहे. अशातच त्याच्या संकटात आणखी वाढ झाली आहे.
सुशील कुमार व्यावसायिक कुस्तीपटू असून तो उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ कार्यकारी व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. परंतु त्याने केलेल्या कृत्यांमुळे त्याला या पदावरून काढून टाकण्यात येणार आहे. तसेच सुशील कुमारला शालेय खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रसाल स्टेडियमवर ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटीचे पद देण्यात आले होते, पण आता त्याला हे सर्वच गमवावे लागणार आहे.
उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, दीपक कुमार यांचे म्हणणे आहे की, “रविवारी रेल्वे बोर्डाला सुशील कुमार संदर्भात दिल्ली सरकारकडून अहवाल मिळाला आहे. ज्यामध्ये सुशील कुमारविरूद्ध एफआयआर दाखल केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकले जाईल.”
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशील कुमारला येत्या दोन ते तीन दिवसात पदावरून निलंबित केले जाणार आहे. २०१५ पासून सुशील कुमार, रेल्वे अधिकारी सोबतच दिल्ली सरकारमध्ये डेप्युटेशनवर कार्यरत होता. त्याचा कार्यकाळ २०२० पर्यंतच होता. परंतु सुशील कुमारने हा कार्यकाळ वाढवण्याची मागणी केली होती. जी आता दिल्ली सरकारने फेटाळून लावली आहे.
नक्की काय घडलं?
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियम मध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले होते.हे सर्व प्रकरण मॉडेल टाऊन पोलीस स्थानक परिसरात घडले होते. या चकमकीत पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हत्येचा आरोप असलेला २ वेळेस ऑलिम्पिक पदक मिळवणारा कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा सहकारी अजय हे दोघेही गेले काही दिवस फरार होते. परंतु त्यांना पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.
सुशील कुमार ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक २ पदक जिंकणारा भारताचा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्या’ वेळी झालो होतो बेचैन, दीर्घ प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या सूर्यकुमारचा खुलासा
‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री रनमशीन विराटच्या प्रेमात झाली होती वेडी, पाहा त्यांचे व्हायरल फोटो
आयपीएलला मुहूर्त सापडला? उर्वरित १४ व्या हंगामाला युएईमध्ये ‘या’ दिवशी सुरुवात होण्याची शक्यता