---Advertisement---

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री रनमशीन विराटच्या प्रेमात झाली होती वेडी, पाहा त्यांचे व्हायरल फोटो

On: मंगळवार, मे 25, 2021 6:15 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध जोडपे असणाऱ्या विरुष्काच्या आयुष्यात एका चिमुकल्या परीचेही आगमन झाले आहे. असे असले तरीही, बऱ्याचदा कोहलीच्या जुन्या अफेयर्सची किंवा प्रेयसींची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते. सध्या त्याच्या एक्स गर्लफ्रेंड इजाबेल हिचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

इजाबेल ही प्रसिद्ध ब्राझिलियाई मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यामुळे ती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की, इजाबेल एकेकाळी विराटच्या प्रेमात वेडी झाली होती. अनुष्कासोबत लग्न करण्यापूर्वी विराट दोन वर्षे तिला डेट करत होता.

सहमतीने नाती तोडले
इजाबेलने एका मुलाखतीमध्ये आपले आणि विराटचे नाते कबूल केले होते. पण त्यावेळी नुकतेच ते एकमेकांपासून दूर झाले होते. तिने म्हटले होते की, “आम्ही दोघे एकमेकांना डेट करत होतो. पण आता आम्ही एकमेकांच्या सहमतीने हे नाते तोडले आहे.”

https://twitter.com/bhushan_7/status/462166140026753024?s=20

आमिर खानसोबत बॉलीवूडमध्ये पहिले पाऊल
इजाबेलने तिच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात 2012 मध्ये केली होती. तिने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबत ‘तलाश’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. त्यानंतर इजाबेल 2013 मध्ये ‘सिक्सटीन’ आणि 2014 मध्ये ‘पुरानी जीन्स’ या सिनमांमध्ये झळकली होती. याबरोबरच तिने अनेक तेलुगू चित्रपटातही काम केले आहे.

गुरु रंधावासोबत ‘लहोर’ गाण्यातून लोकांच्या मनात
इजाबेल अनेक संगीत व्हिडिओमध्ये पण दिसून आली आहे. तिचा गुरु रंधावासोबत ‘लहोर’ हा सुप्रसिद्ध झालेला व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ यूट्यूबवर जवळपास 900 मिलियन लोकांनी पाहिला आहे.

विराट कोहली कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या तयारीत
विराट कोहलीबाबत बोलायचे झाले तर, तो सध्या पहिलावहिला आयसीसी चषक आपल्या नावे करण्याच्या तयारीत आहे. जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. येथे त्यांना न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळायचा आहे. 18 ते 22 जून दरम्यान साउथम्पटनच्या मैदानावर होणारा हा सामना जिंकताच कर्णधार विराट पहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा किर्तीमान करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताच्या ‘या’ खेळाडूंकडे आहे चिक्कार पैसा, तरीही करतात सरकारी नोकरी; काही नावं ओळखीची

‘रोहित एक दिग्गज आहे, तुझा तो दर्जा नाही’, पाकिस्तानी गोलंदाजांला ‘या’ क्रिकेटरने दाखवली पात्रता

‘हा’ एकटा एकीकडे आणि दुसऱ्या संघाचे आख्खे गोलंदाज एकीकडे, वाचा दक्षिण आफ्रिकेच्या सरकार गोलंदाजाबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---