नोव्हेंबरमध्ये भारतीय महिला संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ 5 टी20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी मिताली राज तर टी20 मालिकेसाठी हरमनप्रीत कौर यांना कर्णधारपदी कायम करण्यात आले आहे.
तसेच यष्टीरक्षक फलंदाज सुष्मा वर्माचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. ती शेवटचा वनडे सामना इंग्लंड विरुद्ध एप्रिल 2018 मध्ये खेळली आहे.
त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या टी20 मालिकेतील भारतीय महिला संघच वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही बीसीसीआयने कायम केला आहे. त्यामुळे वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेतही शेफाली वर्मा, हरलीन देवोल यांना आणखी एक संधी मिळाली आहे.
या वेस्ट इंडीज दौऱ्याला 1 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने सुरुवात होणार आहे. या वनडे मालिकेतील तिन्ही सामने अँटिग्वा येथे होणार आहेत. हे सामने अनुक्रमे 1, 3 आणि 6 नोव्हेंबरला होतील. त्यानंतर 9 नोव्हेंबरपासून 5 टी20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.
या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने अनुक्रम 9 आणि 10 नोव्हेंबरला सेंट लूसिया येथे तर शेवटचे तीन सामने अनुक्रमे 14, 17 आणि 20 नोव्हेंबरला गयाना येथे होणार आहेत.
असा आहे भारतीय महिला वनडे संघ: मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, जेमीमा रॉड्रिगेज, दीप्ती शर्मा, पुनम राऊत, डी.हेमलता, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी, पुनम यादव, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), प्रिया पुनिया, सुशमा वर्मा(यष्टीरक्षक).
भारतीय महिला टी20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमीमा रॉड्रिगेज, शेफाली वर्मा, हरलिन देवोल, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पुनम यादव, राधा यादव, वेदा कृष्णमुर्ती, अनुजा पाटील, शिखा पांडे, पुजा वस्त्रकार, मानसी जोशी, अरूंधती रेड्डी.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–श्रीलंकेला सापडला दुसरा लसिथ मलिंगा, पहा व्हिडिओ
–दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर लान्स क्लूजनर झाला या मोठ्या संघाचा हेड कोच
–टी२०मध्ये यष्टीरक्षणात धोनीलाही मागे टाकणाऱ्या या महिला क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती