भारतातील सर्वच प्रमुख क्रिकेटपटू एप्रिल-मे महिन्यात आयपीएल खेळण्यात व्यस्त असतात. मात्र, कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा हा इंग्लंडमध्ये ससेक्स संघासाठी काऊंटी क्रिकेट खेळत असतो. मागील हंगामात त्याने संघाच्या यशात मोठी भूमिका बजावली आहे. तसेच मागील हंगामात त्याला संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली होती. आता त्याला यावर्षी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याची देखील साथ लाभणार आहे. ससेक्स काऊंटी संघाने नुकताच स्मिथ याच्याशी करार केल्याची घोषणा केली.
काऊंटी चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत पुजारा ससेक्स संघासाठी खेळताना दिसलेला. त्याने या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केलेली. त्यानंतर झालेल्या वनडे स्पर्धेतही त्याने चार शतके झळकावलेली. आता पुन्हा त्याच्यासोबत क्लबने करार वाढवलेला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ याला देखील करारबद्ध केले. स्मिथ पूर्ण हंगामात संघासोबत नसेल. तो केवळ तीन सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व करेल. क्लबने अधिकृत ट्विट करत ही माहिती दिली. स्मिथ आगामी ऍशेस मालिकेची तयारी या स्पर्धेतून करेल.
स्मिथ यावेळी आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचा भाग नसल्याने त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत स्मिथ चांगल्या फॉर्ममध्ये दिसलेला.
Coming to Sussex this May: Steve Smith. 🙌 pic.twitter.com/GevrnjdUIf
— Sussex Cricket (@SussexCCC) January 19, 2023
स्मिथ सोबतच यावेळी पाकिस्तानचा टी20 उपकर्णधार शादाब खान हा देखील ससेक्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. मात्र, तो केवळ टी20 स्पर्धेत खेळेल. ससेक्स संघात अनेक प्रतिष्ठित खेळाडूंचा समावेश आहे. पुजारा, स्मिथ व शादाब व्यतिरिक्त संघात जोफ्रा आर्चर व ओली रॉबीन्सन इंग्लंडच्या कसोटी संघातील खेळाडू सामील आहेत.
(Sussex County Club Singed Australian Steve Smith Cheteshwar Pujara Contract Extended)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाने विराटला दिला रणजी खेळण्याचा सल्ला; म्हणाले, “न्यूझीलंडविरुद्ध…”
पाकिस्तानची नाचक्की सुरूच! तीन दिग्गजांनी मुख्य प्रशिक्षक होण्यास दिला नकार