स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. गेले २ दशके त्याने जागतिक टेनिसमध्ये मोठे यश मिळवले आहे, दरम्यान ४० वर्षीय फेडरर त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. अशातर अशी बातमी समोर येत आहे की पुढील काही महिने रॉजर फेडरर कोर्टवर न दिसण्याची शक्यता आहे.
स्विस मीडियाने प्रसिद्ध केलेल्या एका मुलाखतीत रॉजर फेडररने म्हटले की, “गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या विम्बल्डनपर्यंत तो परतण्याची शक्यता कमी आहे.” तसेच रॉजर फेडररने ‘ट्रिब्यून डी जिनिव्हा’ दैनिकाला म्हटले की, “सत्य हे आहे की जर मी विम्बल्डनमध्ये खेळलो, तर खूप आश्चर्य वाटेल.”
विम्बल्डन स्पर्धा २७ जून २०२२ पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी जानेवारीमध्ये १७ तारखेपासून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत देखील फेडरर खेळणार नाही. यावर्षी जुलैमध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये पराभव झाल्यानंतर फेडरर खेळला नाहीये. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जी १८ महिन्याच्या कालावधीत गुडघ्याची तिसरी शस्त्रक्रिया होती. त्यामुळे तो गेल्या २ वर्षांत अनेक स्पर्धांना मुकला आहे.
तसेच रॉजर फेडरर पुढे म्हणाला की, “यामध्ये काहीच आश्चर्य नाहीये. या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी आम्हाला काही महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागेल, हे शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच आम्हाला माहीत होते.”
फेडरर टेनिसमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. फेडरर, नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदाल यांच्या नावावर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम विजेतीपदं आहेत. हे तिघे पुरुषांच्या एकेरी गटात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान दवाचा प्रभाव जाणवणार? पाहा कोणासाठी असेल अनुकूल खेळपट्टी
असेच मोठे खेळाडू घडत नाहीत! जेव्हा दंगलीची पर्वा न करता गुवाहाटीला पोहोचली होती सानिया, वाचा किस्सा