सिडनी। आजपासून भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली आहे.
त्याने या सामन्यात 199 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले आहे. हे शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 18 वे शतक ठरले आहे. तसेच पुजाराने आज केलेले हे शतक ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या कसोटी मालिकेतील त्याचे तिसरे शतक आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
टॉप 5: चेतेश्वर पुजाराने केले हे खास विक्रम –
1. कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
11 – सचिन तेंडुलकर
08 – सुनील गावसकर
07 – विराट कोहली, चेतेश्वर पुजारा
2. कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पुजाराचे हे 17 वे शतक आहे. त्यामुळे त्याने कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके करण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत केन विलियमसनच्या 17 शतकांची बरोबरी केली आहे. हे दोघेही या यादीत संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आले आहेत
या यादीत अव्वल क्रमांकावर 32 शतकांसह रिकी पॉटिंग आहे. त्याच्या पाठोपाठ राहुल द्रविड(28), हाशिम आमला(25), डॉन ब्रॅडमन(20) हे फलंदाज आहेत.
3. कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीत सर्वाधिक शतके करणारे भारतीय फलंदाज –
6 – सचिन तेंडुलकर, विराट कोहली
5 – सुनील गावसकर
4 – व्हीव्हीएस लक्ष्मण
3* – चेतेश्वर पुजारा
4. सर्वात जलद 18 कसोटी शतके करणारे भारतीय फलंदाज (डावानुसार) –
82 डाव – सुनील गावसकर
99 डाव – सचिन तेंडुलकर
103 डाव – विराट कोहली
114 डाव – चेतेश्वर पुजारा
121 डाव – मोहम्मद अझरुद्दीन
5. ऑस्ट्रेलियामध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके करणारे भारतीय फलंदाज –
4 शतके – विराट कोहली (2014-15)
3 शतके – सुनील गावसकर (1977-78)
3 शतके – चेतेश्वर पुजारा (2018-19)
महत्त्वाच्या बातम्या:
–धावांचा रतिब घालणाऱ्या मयांक अगरवालच्या नावावर दुसऱ्याच कसोटीत नकोसा विक्रम
–टीम इंडियाचा तारणहार चेतेश्वर पुजाराचा कांगारूंविरुद्ध विक्रमांचा डंका
–विराट कोहली एक्सप्रेस सुसाट, सचिन, लाराचे विक्रम मोडीत