सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग सुरु आहे. या स्पर्धेत रोज काहीना काही अजब घडताना दिसते. या स्पर्धेत शुक्रवारी सिडनी थंडर्स आणि एडिलेड स्ट्राइकर्स या संघामध्ये सामना खेळवला गेला. एडिलेडने पहिल्यांदा फलंदाजी करत 9 गडी गमावत 139 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला सिडनी थंडर्स संघ अवघ्या 15 धावांवर गारद झाला. एडिलेडच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकली. बीबीएल स्पर्धेतील ही धावसंख्या निच्चांकी ठरली आहे. या सामान्याच्या आधी झालेल्या निच्चांकी धावसंख्या करणाऱ्या संघांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
बिग बॅश लीग स्पर्धेतील सर्वात निच्चांकी धावसंख्या सिडनी थंडर्स संघाने केली. त्यामुळे नकोश्या वाटणाऱ्या विक्रमांच्या यादीत आपल्या संघाच्या नोंद केली आहे. याआधी हा नकोसा विक्रम मेलबर्न रेनेग्रेड्स या संघाच्या नावावर होता. 2014मध्ये 57 धावांवर रेनेग्रेड्स संघ गारद झाला होता. या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही मेलबर्न रेेनेग्रेड्स हाच संघ आहे. रेनेग्रेड्सने 2020मध्ये 60 धावांवर आपला गाशा गुंडाळला.
याआधी झालेल्या सर्वात कमी धावसंख्या खालील प्रमाणे,
15-सिडनी थंडर्स (2022)
57-रेनेग्रेड्स (2014/15)
60-रेनेग्रेड्स (2020/21)
61- स्टार्स (2021/22)
68- स्ट्राईकर्स (2020/21)
69- स्कॉर्चर्स (2012/13)
शुक्रवारी (दि.16 डिसेंबर) सिडनी थंडर्स आणि एडिलेड स्ट्राईकर्स या संघात सामना खेळवला गेला. एडिलेडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी निर्धीरित 20 षटकांमध्ये 139 धावा केल्या. एडिलेड संघासाठी ख्रिस लिन (Chris Lynn) आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम (Colin De Grandhomme) यांंनी चांगली खेळी केली. लिनने 36 तर ग्रॅंडहोमने 33 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासाळला आणि अवघ्या 15 धावांवर सर्वबाद झाला. एडिलेड संघासाठी हेन्री थॉर्नटर्न (Henry Thornton) याने धमाकेदार प्रदर्शन केले. त्यानेे 2.5 षटकात 3 धावा देत 5 गडी बाद केले.(Sydney Thunder has scored lowest score in BBL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकाच क्लिकवर जाणून घ्या आयपीएल 2023 लिलावाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे, वाचा सविस्तर
कसोटी सामना भारताच्या जवळपास खिशात, बांगलादेशला जिंकण्यासाठी 471 धावांची गरज