जगातील महान फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या जोरदार चर्चेत आहे, कारण भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद सोडून (Virat Kohli Step Down As Test Captaincy) त्याने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. दिग्गज क्रिकेटपटूंनी विराटच्या या निर्णयावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यातच भारताच्या १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार सय्यद किरमानी (Syed Kormani)ने कोहलीबद्दल मोठे व्यक्तव्य (Syed Kirmani On Virat Kohli) केले आहे. त्यांनी कोहलीला कर्णधारपद सोडण्यावरुन फटकारले आहे.
माजी यष्टिरक्षक आणि महान फलंदाज सय्यद किरमानीने सांगितले की, “विराट असं दाखवतं आहे की तो ‘लूजर’ आहे, जो तो नाही. कोहली नेहमी पराभवाबाद्दल गंभीर असतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. प्रत्येकवेळी आपण चॅम्पीयन बनू शकत नाही, हे संघाला आणि खेळाडूला समजून घेणे आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये जिंकणे आणि हारणे देखील आवश्यक आहे. आम्ही १९८३ मध्ये विश्वविजेत्या संघाला हरवत विश्वचषक जिंकला होता.”
व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’
कोहलीने मानले रवी शास्त्री आणि महेंद्रसिंग धोनीचे आभार
विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्यासोबतच ट्विटर पोस्टद्वारे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार व दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे आभार मानले आहेत. त्याने असे लिहले की, “रवी भाई आणि स्टाफचे आभार जे कसोटी क्रिकेटमध्ये सतत पुढे चालत राहिलेल्या गाडीचे इंजिन होते.” धोनीबद्दल त्याने लिहले की, “शेवटी ज्याने एक कर्णधार म्हणुन माझ्यावर विश्वास ठेवला त्या महेंद्रसिंग धोनीचे खुप खुप आभार. त्याला मी भारतीय क्रिकेटला पुढे घेवून जाण्यास सक्षम वाटलो, त्यामुळे त्याचे धन्यवाद.”
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
विराट कोहली यशस्वी कसोटी कर्णधार
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, ज्यामधील ४० सामने संघाने जिंकले आहेत, तर १७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ परदेशात जिंकायला शिकला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये मालिका जिंकल्या. कोहली नेहमीच मैदानातील आक्रमकतेसाठी ओळखला जातो.
किरमानीची कारकीर्द
दरम्यान कोहलीच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देणारा सय्यद किरमानी हा भारतातील महान यष्टीरक्षकांपैकी एक आहे. तो १९८३ सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. झिम्बाब्वेविरुद्ध कपिल देवसोबत महत्वपुर्ण कामगीरी केली होती. किरमानीने भारतीय संघासाठी ४९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने भारतासाठी ८८ कसोटी सामने खेळले असून २७५९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतकांचा सामावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अंडर-१९ विश्वचषकात ‘यंगिस्तान’चा धमाका, दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत स्पर्धेची केली विजयी सुरुवात
‘त्या’ एका ट्वीटमुळे बदललं सर्वकाही, विराटनंतर आता भारतीय क्रिकेटमध्ये सुरू होणार रोहितपर्व!
हेही पाहा-