भारतात सध्या स्थानिक क्रिकेटला सुरुवात होत असून, येत्या 10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीची सुरुवात होत आहे . कोरोनामुळे संघांचे विविध गट पाडण्यात आले असून, एका गटात असणाऱ्या संघांना एका विशिष्ट शहरातच सर्व सामने खेळावे लागतील. यानुसार गट ‘ इ ‘ मध्ये मुंबई संघाचा समावेश करण्यात आला असून ते सर्व सामने मुंबईतच खेळणार आहेत.
कोरोनामुळे खेळाडूंना आपल्या हॉटेलमध्येच रहावे लागत आहे. खेळाडूंना आवश्यक सर्व गरजा या हॉटेलमध्येच पुरवल्या जातात . मात्र अशाचवेळी बातमी समोर येत आहे की मुंबई संघातील खेळाडूंनी आपण राहत असलेल्या हॉटेलमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई संघ सध्या मुंबई येथीलच एका हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. खेळाडूंनी या हॉटेलमधील जेवणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंच्या मागणीला सकारात्मक घेत हॉटेल व्यावसायिकांनी जेवणाच्या गुणवत्तेत वाढ केली आहे. मुंबई संघाचे प्रबंधक अरमान मलिक यांनी हॉटेलच्या प्रमुखांशी बातचीत करत खेळाडूंची समस्या सोडवली आहे.
खेळाडूंनी रविवारी दिलेल्या जेवणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती, मात्र ती आता दूर करण्यात आली आहे. मुंबई संघा सोबतच दिल्ली संघ देखील याच हॉटेल मध्ये वास्तव्यास असून , रिपोर्टनुसार दिल्ली संघातील खेळाडूंनी देखील जेवणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
ग्रुप ‘ इ ‘ मध्ये मुंबई व दिल्ली सोबतच केरळ, आंध्र प्रदेश, पुदुचेरी आणि हरियाणा संघाचा समावेश आहे. सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेला 10 जानेवारीपासून सुरुवात होत असून, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई संघाकडून सर्व क्रिकेटरसिकांना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय संघावर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंत्र्याला वसीम जाफर यांचे सडेतोड उत्तर, केले असे ट्विट






