वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी बांगलादेशच्या संघाने आपल्या संघाची आज घोषणा केली. बंदीमुळे वर्षभर स्पर्धात्मक क्रिकेटपासून लांब असणाऱ्या शाकिब अल हसनचे या संघात पुनरागमन झाले असून तमिम इक्बालकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. मात्र माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज मश्रफी मोर्तझाला संघातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
२४ सदस्यीय संघाची घोषणा
बांग्लादेश दौऱ्यावर वेस्ट इंडिजचा संघ ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने चट्टोग्राम आणि ढाका या दोन शहरात खेळवले जातील. या मालिकेसाठी बांग्लादेशने आज २४ सदस्यीय संघाची घोषणा केली. अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनचे या संघात अपेक्षित पुनरागमन झाले आहे. मात्र माजी कर्णधार मश्रफी मोर्तझाला २४ खेळाडूंच्या प्राथमिक संघातही स्थान मिळालेले नाही.
मोर्तझाने नुकत्याच झालेल्या बंगबंधू टी-२० स्पर्धेत आपली तंदुरुस्ती सिद्ध केली होती. तसेच यादरम्यान ५ बळी घेत आपल्यात अजूनही क्रिकेट शिल्लक असल्याचे दर्शविले होते. मात्र बांग्लादेशच्या निवड समितीने २०२३च्या विश्वचषकावर नजर ठेवत त्याला वगळण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.
बांग्लादेशचा वनडे संघ-
तमिम इकबाल खान (कर्णधार), तस्कीन अहमद, शाकिब अल हसन, मोहम्मद अल अमीन हुसैन, नजमुल हुसैन शान्तो, मोहम्मद शोरफुल इस्लाम, मुशफिकुर रहीम, हसन महमूद, अभिमन्यू मिथुन, सैफ उद्दीन, लिटन कुमेर दास, मुस्तफिजुर रहमान, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराज, आफिफ हुसैन ध्रूबो, तईजुल इस्लाम, मुसद्देक हुसैन सैकत, नासुम अहमद, सौम्य सरकार, मोहम्मद परवेज हुसैन इमोन, यासिर अली चौधरी, मेहदी हसन, नईम शेख, रूबेल हुसैन
बांग्लादेशचा कसोटी संघ-
मोमिनुल हक, तस्कीन अहमद, तमिम इकबाल खान, सैयद खालिद अहमद, शाकिब अल हसन, हसन महमूद, नजमुल हुसैन शान्तो, मुस्तफिजुर रहमान, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, मोहम्मद मिथुन, तईजुल इस्लाम, लिटन दास, काजी नुरुल हसन, यासिर अली चौधरी, शदमान इस्लाम, मोहम्मद सैफ हसन, नईम हसन, अबू जायद चौधरी राही, इबादत हुसैन चौधरी
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी- श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघातील ‘या’ खेळाडूचा रिपोर्ट आला कोरोना पाॅझिटिव्ह
एका शब्दात रोहितची ओळख..? चाहत्याच्या प्रश्नावर पाकिस्तानी दिग्गजाने दिले मन जिंकणारे उत्तर